मुंबई : मानवी शरीराला ऑक्सिजनची फार आवश्यकता असते. देशभरात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ऑक्सिनजची पातळी किती महत्त्वाची असते हे देखील आपल्या लक्षात आलं. दरम्यान काही पदार्थ तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. जर या पदार्थांचं नियमित आणि मर्यादेत सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची आवश्यक ती पातळी राखणं अधिक सोपं होतं.


संत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असतं. नियमित आणि विशिष्ट मर्यादेत संत्र्याचं सेवन पचन सुधारण्यास त्याचप्रमाणे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतं. संत्री शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.


सफरचंद


सफरचंदामध्ये अॅन्टीऑक्सिडंट हा गुणधर्म असतो. हा अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. शरीरातील नव्या सेल्सच्या निर्मितीसाठी आवश्यक पोषक तत्व सफरचंदाच्या सेवनाने मिळतात. तसंच शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी सफरचंद नियमित खाणं फायदेशीर ठरतं.


आंबा


आंब्याच्या सेवनाने शरीराला व्हिटॅमीन ए मिळतं. उन्हाळ्याच्या दिवसात हे फळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. आंब्याचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासही मदत होते. शिवाय शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आंबा खूप महत्त्वपूर्ण आहे.


स्ट्रॉबेरी


स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि पॉलीफेनोल हे घटक असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. स्ट्रॉबेरी हे फळ शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठीही महत्त्वाचं आहे.