मुंबई : पाऊस गेल्यानंतरही मच्छरांचा त्रास काही कमी होत नाही. उलट ते अधिक वाढतात. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला थंडीच्या दिवसात डेंग्य़ूसारख्या आजाराच्या कचाट्यात घेऊ शकतो. त्यामुळे घरच्याघरी मच्छरांना पळवून लावण्याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 


लवंग आणि खोब-याचं तेल -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवंगच्या तेलाच्या वासाने मच्छर पळतात. त्यामुळे खोब-याच्या तेलात लवंगीच्या तेलाचं मिश्रण करून ते अंगावर लावा. त्याने तुम्हाला मच्छर चावणार नाहीत. तेलाचं हे मिश्रण ओडोमॉससारखं काम करतं. 


झेंडूच्या फुलाचा वास -


झेंडूच्या फुलांच्या सुगंधाने घर प्रसन्न होतं. त्यामुळे झेंडूची झाडे आपल्या घरात लावा. झेंडूच्या फुलांच्या वासाने मच्छर दूर पळतात. म्हणजे घर सुगंधाने प्रसन्नही होईल आणि मच्छरही पळतील. 


कापूराचा धूर -


मच्छरांचा त्रास कमी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. कापूराची एक वडी जाळून खोलीत ठेवा. यातून निघणा-या सुगंधाने मच्छर पळून जातात. हा उपाय सर्वात चांगला आणि सोपा आहे. 


लिंबूचा रस - 


घरात मच्छरांना पळवून लावण्यासाठी वापरत असलेल्या लिक्विड रिफिलमध्ये लिंबूचा रस टाकून वापरू शकता. याने सर्व मच्छर मरून जातात. हा प्रयोग आठवड्यातून दोनदा करावा. तसेच नीलगिरीच्या तेलात लिंबूचा रस मिश्रण करूनही लावू शकता. 


कडूलिंब -


कडूलिंबाची पाने अनेक गोष्टींसाठी उपयोगात पडतात. या पानांचा धुर करा. आठवड्यातून एकदा घरात अर्ध्या तासासाठी धुर करा. याने मच्छरांसोबत दुसरे किटकही मरतील. पण हे करताना घरात कुणाला श्वसनाचा त्रास असेल तर काळही घ्या.