या `5` स्वभावाच्या मुलींसोबत झटपट लग्न करण्याचा मुलांचा असतो विचार !
लग्नाच्या गाठी ब्रम्हदेव वरतीचं बांधतो.... असं अनेकांचं मत असते.
मुंबई : लग्नाच्या गाठी ब्रम्हदेव वरतीचं बांधतो.... असं अनेकांचं मत असते. पण प्रत्येकाच आपल्या साथीदाराकडून काही अपेक्षा असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये या अपेक्षा पूर्ण होतील असं जेव्हा आपलं मन आपल्याला सांगतं तेव्हा नात्यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला जातो. मुलांना अपेक्षेनुसार मुलगी आयुष्यात आल्याची खात्री झाली की ते 'चट मंगनी पट ब्याह'चा निर्णय घेतात.
मुलींमधल्या अशा कोणत्या गोष्टी मुलांना आकर्षित करतात ?
1. मुलांना आत्मविश्वासू आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहणार्या मुली आवडतात. अशा मुलींसोबत त्यांचं जमणार अशी खात्री वाटली की मुलं लग्नाचा विचार पक्का करायला फार वेळ लावत नाही.
2. प्रत्येकालाच आपला साथीदार समजुतदार असावा असं वाटत असतं. स्मार्ट आणि समजुतदार मुलींसोबत राहणं मुलांना अधिक आवडतं. एखादी समस्या मुली उत्तमप्रकारे सांभाळू शकतात हा विश्वास त्यांच्या मनात असतो.
3. आजकाल स्वतंत्र आणि चौकोनी कुटुंबव्यवस्थेमुळे मुलांना पालकांसोबत, घरातील सार्या नातेवाईंकांसोबत फार काळ एकत्र राहण्याची सवय नसते. पण किमान पालकांचा, नातेवाईकांचा आदर ठेवणारी मुलगी निवडणं ते पसंत कारतात.
4. आजकाल तणवग्रस्त होत चाललेल्या जीवनशैलीमुळे नात्यामध्ये स्पेस मिळणं हे अत्यावश्यक होत आहे. इतरांकडून फारशी अपेक्षा नसली तरीही साथीदाराने कटकट न करता आवश्यक स्पेस द्यावी असे मुलांना हमखास वाटते.
5. गोष्टी फिरवून बोलणं, जजमेंटल राहून सारे विचार करणर्या मुलींपेक्षा विचारात स्प्ष्टता असलेल्या, टू द पॉईंट बोलणार्या मुली मुलांना अधिक योग्य वाटतात.