मुंबई : बेली फॅट किंवा स्थूलता कोणत्याही व्यक्तीला आवडत नाही. मात्र सध्याची जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या पद्धतीमुळे  वयोमानानुसार लठ्ठपणाची समस्या उद्धभवते. लठ्ठपणाचा प्रभाव हा तुमच्या दररोजच्या कामावर होतो. स्थूलतेपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला चांगल्या सवयी लावून घेणं गरजेचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे पदार्थ तुमच्यासाठी फॅट कटर फूड म्हणून काम करतील.


 कॉफी


कॉफीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर विविध होताना दिसतो. कॉफीमध्ये असलेले रासायनिक कॅफीन लोकांच्या चयापचय गतीला वाढवतात. मुख्य म्हणजे शरीराचा चयापचय दर हा कॉफीच्या प्रमाणावर अवलंबून असतो.


द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशनमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, कॅफेनच्या सेवनामुळे अनेकदा शरीरातील चरबीच बर्न होण्याला वेग मिळतो. ज्यामुळे मेटाबॉलिझम देखील वाढतं


अंड


अंड्याचा पांढरा भाग खाल्ला पाहिजे. हा भाग संपूर्णपणे अमीनो ऍसिडचे बनलेले प्रोटीन आहे. प्रोटीनचं सेवन केल्याने आपल्या शरीरातील चयापचय गती वाढते. 


जर्नल ऑफ द अमेरीकन कॉलेज ऑफ न्यूट्रीशनमध्ये नमूद केल्यानुसार, ज्या व्यक्तींचं वजन जास्त असतं त्या व्यक्तींनी नाश्त्यात अंडी खातात. त्याच व्यक्ती नंतर कमी खातात. कमी खाणे हे वजन कमी करणं आणि फॅट बर्निंगशी देखील संबंधित आहे.


दही


दह्यामध्ये असलेले लिनोलिक अॅसिड शरीरातील चरबी कमी करण्यासोबतच वजन कमी करण्याचंही काम करतात. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. 


ग्रीन टी


कॅलरी बर्न करण्याचा विषय आला की, ग्रीन टी पिण्याचा सल्ला हमखास दिला जातो. ज्या व्यक्ती ग्रीन टीचं सेवन करतात त्यांच्या शरीरात फॅट कमी जमा होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे फॅट बर्निंगसाठी ग्रीन टीचं सेवन फायदेशीर ठरतं.