मुंबई : अनेक घरांमध्ये अजूनही तांब्या-पितळ्याची भांडी जपून ठेवलेली आहेत. पूर्वी तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकघरात प्रामुख्याने केला जात असे. मात्र आता कालानुरूप त्यामध्ये बदल झाला आहे.  


 तांब्याच्या  भांड्यामध्ये पाणी -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवणं हे आरोग्यदायी समजले जाते. नियमित पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. मात्र जेवणासाठी तांब्याचा भांड्याचा वापर करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.  


 तांब्याच्या भांड्यामध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत?   


 पाण्याचा साठा तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवणं फायदेशीर असले तरीही दही,दूध, लिंबूपाणी यासारखे आंबट आणि अ‍ॅसिडिक पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये साठवू नका.  


 का ठरते त्रासदायक? 


 दूध, दही किंवा त्यासारखे आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्याने किंवा त्याचे सेवन करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.  दह्यामध्ये कॅल्शियम,मॅग्नेशियम,प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यासारखे घटक असतात.  
 जेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये दह्यासारख्र पदार्थ साठवले जातात तेव्हा त्यामधील घटकांची तांब्यासोबत रिअ‍ॅक्शन होते. परिणामी हे सारे पदार्थ विषारी होतात.  


कोणत्या आजाराचा धोका ? 


तांब्याच्या भांड्यातून अशाप्रकारचे पदार्थ खाणं आरोग्याला त्रासदायक ठरते. तांब्याच्या भांड्यातून अशाप्रकराचे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास, काविळ, डायरिया, उलट्यांचा त्रास होऊ शकतो. 


तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हितकारी असलं तरीही त्यामध्ये कोणतेही कापलेले फळ साठवू नका. तसेच फळांचा रस पिऊ नका.