मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकजण इम्युनिटी वाढवण्यावर भर देतोय. चांगली इम्युनिटी कोरोना सारख्या गंभीर व्हायरसपासून गदूर ठेवण्यास मदत करते. तर काही खाद्यपदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास इम्युनिटी पॉवर वाढवण्यास मदत करतात. हे पदार्थ रिकाम्या पोटी खाणं उत्तम असतं कारण त्यावेळी आपल्या पाचन तंत्रावर इतर पचन कार्यांचा दबाव नसतो. यामुळे तुम्हाला फार फायदा होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बघूया कोणते 3 पदार्थ रिकाम्या पोटी खाणं फायदेशीर ठरतं.


लसूण


लसूणमध्ये अँटीबायोटीक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे सहाजिकच हे पदार्थ इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे ब्लड शुगर लेवलला नियंत्रणात आणण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि फुफ्फुसांसंदर्भातील समस्यांवर उपचार करण्यासाठी लसूण मदत करतं. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला लसणीचं सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. 


आवळा


आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन असल्याने इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. गरम पाण्यासाोबत आवळ्याचं सेवन केलं जातं. तसंच आवळ्यात अँटीऑक्सिडंट असल्याने रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही आवळा उपयुक्त मानला जातो.


मध


सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत एक चमचा मध घेतल्यास वजन घटवण्यास, त्वचेचं आरोग्य जपण्यास आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतं. स्वाद येण्यासाठी यामध्ये तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. या ड्रिंकमध्ये अँटीबॅक्टिरीयल प्रॉपर्टी असून इम्युनिटीसाठी फार उपयुक्त आहे.