मुंबई : एस्ट्राजेनेका आणि स्पुतनिक लाइटच्या संयोजनाचा वापर करण्यासाठी एक छोट्या प्रमाणात क्लिनिकल अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कॉकटेल लसीचा कोरोनावर चांगला परिणाम होत आहे. यासह, अँटीबॉडीजची वाढ देखील चांगली होताना दिसली, रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)ने सोमवारी अभ्यास अहवालाचा हवाला देत हे सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा डेटा 20 लोकांकडून गोळा करण्यात आला आहे. या सर्वांचा अभ्यास फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला. त्यांना प्रथम एस्ट्राजेनेका देण्यात आली. त्यानंतर 29 दिवसांनी त्यांना स्पुतनिक लाइटचा डोस देण्यात आला.


अंतरिम विश्लेषणाच्या निकालांच्या आधारे, 57व्या दिवशी स्वयंसेवकांच्या 85 टक्के शरीरात अधिक अँटीबॉडी असल्याचं समजलं. स्पुतनिक लाइट लसीतील मानवी एडेनोव्हायरस सेरोटाइप 26 एस्ट्राजेनेकाच्या लसीमध्ये मिसळले गेले. या लस कॉकटेलमध्ये, मानवी एडेनोव्हायरस 26 पहिला कंपोनंट म्हणून आणि मानवी एडेनोव्हायरस सेरोटाइप 5 दुसरा घटक म्हणून जोडला गेला.


आरडीआयएफने म्हटलं आहे की, एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली लस तसंच स्पुतनिक लस एकत्र करून तयार केलेली लस खूप प्रभावी आहे.


Sputnik-V चे दोन्ही डोस घेतल्यानंतर, कोविड -19 च्या विरोधात 80% एफिकेसी दिसून आली आहे. त्याच वेळी, स्पुटनिक लाइटने कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात चांगला निकाल दाखवला आहे. 


कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट्सवर स्पुटनिक लाइट अधिक प्रभावी आहे. हे जागतिक मानकांवर साठवणं सोपं आहे. हे मानवी एडिनोव्हायरल वेक्टरवर बनवलं आहे. यामध्ये, जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या 250 क्लिनिकल चाचण्यांमध्ये, या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे.


या दोन लसींचे मिश्रण करून बनवलेल्या कॉकटेल लसीला कोरोनाविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती मिळत असल्याचं समोर आलं आहे. तसंच, त्याची क्षमता दीर्घकाळ टिकेल असा दावा केला जातोय.