मुंबई : IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) ही प्रक्रिया सुरक्षित आहे का? IVF करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तुम्हाला IVF प्रक्रियेची गरज केव्हा आहे? असे प्रश्न अनेक जोडप्यांच्या मनात असतात. काहीजणं याची उत्तरं इंटरनेटवर शोध घेतात. मात्र तुमच्या अशाच काही प्रश्नांची उत्तरं डॉ.निशा पानसरे यांनी दिली आहेत. डॉ. निशा फर्टिलिटी कन्सल्टंट आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IVF संदर्भात तुमच्या मनात असलेले काही प्रश्न


मनातील सर्व प्रश्न क्लियर करून घ्या


जर तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असेल तर फर्टिलिटी एक्सपर्टशी बोलणं कधीही योग्य. IVF प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती घ्या. कोणताही प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका आणि संपूर्ण माहिती घेतल्यावर रूग्णालय निवडा. यामध्ये कोणतीही घाई करू नका.


फिट रहा


जर तुम्हाला आयव्हीएफ उपचार घ्यायचे असतील तर तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या. तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला फिटनेस रूटीन पाळावं लागेल. यामुळे तुमच्यावर असलेला ताणतणाव कमी होईल.  तुम्ही योग्य वजन राखू शकाल.


डाएट


जर तुम्हाला जंक फूड आवडत असेल तर आहारात बदल केलाच पाहिजे. शरीरातील टिश्यूंच्या चांगल्या कार्यासाठी संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. Antioxidant-rich food च्या सेवनाने egg quality चांगली होते.


चांगली झोप घ्या


मनाला शांती आणि आनंद मिळण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. किमान आठ तास झोप घ्यावी.


सिगारेट आणि अल्कोहोलची सवय टाळा


यशस्वी IVF उपचारांसाठी, तुम्ही या सवयींपासून दूर जाणं महत्त्वाचं आहे. त्याचा eggs आणि spermच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. सिगारेट, अल्कोहोल सोडणं तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.


Sperm health सुधारा


नैसर्गिकरित्या स्पर्मशी संख्या कशी वाढवायची याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. साधारणपणे, डॉक्टर हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात, योग्य वजन राखा आणि जास्त घट्ट कपडे घालू नका.