मुंबई :  शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी अनेकदा शेव्हिंगचा पर्याय वापरला जातो. मात्र शेव्हिंग करताना  शेव्हिंग क्रीमचा वापर करण्याऐवजी काही इतर फायदेशीर पर्यायदेखील उपलब्ध आहे. 
मग शेव्हिंग करणं सुकर आणि त्वचादेखील मुलायम ठेवण्यासाठी हे काही पर्याय नक्की आजमावून पहा. 


कोरफड - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरफड हा नैसर्गिक उपाय आहे. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो. तसेच शेव्हिंग केल्यानंतर मॉईश्चर कमी होण्याचा धोकाही कमी होतो.  


बेबी ऑईल 


शेव्हिंग करताना कटसचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही बेबी ऑईलचा वापर करू शकता. यामुळे त्वचेला उत्तम ल्युब्रिकंट मिळते.  


बॉडी लोशन 


त्वचेला होणारा त्रास टाळण्यासाठी तुम्ही बॉडी लोशनचादेखील पर्याय आजमवू शकता. यामुळे त्वचेचे मॉईश्चरायझर टिकून राहते. सोबतच सुगंध राहतो. 


 
खोबरेल तेल 


प्रत्येक घरामध्ये हमखास आढळणारे खोबरेल तेल हे देखील हमखास वापरता येऊ शकते. प्रामुख्याने हिवाळ्याच्या दिवसात त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते.  
शेव्हिंग करण्यापूर्वी तुम्ही शरीरावर खोबरेल तेल लावू शकता.  


शाम्पू आणि कंडीशनर 


तुम्ही शरीरावर शेव्हिंग क्रीमऐवजी शाम्पू किंवा कंडीशनरचा वापर करू शकता. यामुळे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी मदत होते.  शाम्पू हे उत्तम ल्युब्रिकंट आहे.  


शिआ बटर 


शिआ बटरदेखील त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. 


साबण - 


आयत्यावेळेस शेव्हिंग क्रीम उपलब्ध नसेल तर साबण हा पर्याय तुम्ही हमखास वापरू शक्ता. तुमचा नेहमीचा साबण शेव्हिंग करण्यापूर्वीदेखील शरीरावर वापरू शकता.