मॅरोथॉनमध्ये धावताना तुमच्याजवळ या खास गोष्टी असायला हव्यात
हिवाळ्याच्या दिवसात मन आणि शरीर दोन्ही तजेलदार राहते. या दिवसात अनेकजण मॅरोथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होता. नित्य नियमाने धावण्याचा व्यायाम करतात. पण या दिवसात तुम्ही मॅरोथॉनमध्ये सहभागी होणार असाल तर तुमच्याजवळ काही गोष्टी असणं आवश्यक आहे.
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात मन आणि शरीर दोन्ही तजेलदार राहते. या दिवसात अनेकजण मॅरोथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होता. नित्य नियमाने धावण्याचा व्यायाम करतात. पण या दिवसात तुम्ही मॅरोथॉनमध्ये सहभागी होणार असाल तर तुमच्याजवळ काही गोष्टी असणं आवश्यक आहे.
फर्स्ट एड बॉक्स
अनेकदा धावताना दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्याकडे फर्स्ट एड बॉक्स असण गरजेचे आहे.
सॉक्स
धावताना कॅन्व्हसचे शूजा जितके आवश्यक आहेत तितकेच सॉक्स तुमच्याजवळ असणं गरजजेचेआहेत. कम्प्रेशन सॉक्सचा वापर करा. यामुळे शरीरात रक्तपुरवठा नियमित राहण्यासाठी मदत होते. घामामुळे ते लूझही होत नाहीत तसेच पायाला घट्ट राहणार नाहीत.
सनग्लास
दिवसा धावताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सनग्लासचा अवश्य वापर करावा. सन ग्लास युव्ही प्रोटेक्टीव्ह असणं गरजेचे आहे.
रनिंग बेल्ट -
धावताना रनिंग बेल्टचा वापर अवश्य करावा. यामुळे धावताना तुमच्या आवश्यक वस्तू, पैसे, , चावी, मोबाईल आणि पाणी तुमच्याजवळ ठेवता येईल. तसेच हा बेल्ट कंबरेजवळ बांधता येतो.
शूज--
धावताना तुमच्या सोयीनुसार आरमदायी रनिंग शूजची निवड करा. यामुळे तुम्हांला धावताना अडथळा जाणवणार नाही.