मुंबई : कोलेस्ट्रॉल अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे हार्ट अॅटॅकचा धोकाही निर्माण होतो. अधिक तेलयुक्त आहार घेतल्याने तसंच सिगरेट पिणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, ब्रेन स्ट्रोक, यासारखे आजार होण्याचा मोठा धोका असतो. परंतु यावर वेळीच उपचार केल्यास, खाण्यापिण्यात काही बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत होते. 


ओट्स शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवते. ओट्समध्ये फायबर, प्रोटीन असल्याने ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात. जेवणात राजमा खाल्यानेही कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवता येते. दररोज अक्रोड, बदाम खाल्यानेही फायदा होतो. अक्रोड बदामने केवळ कोलेस्ट्रॉलच नाही तर शरीरातील रक्तवाहिन्या अधिक मजबूत होण्यास मदत होते. शरीरात रक्ताभिसरण सुरळित होते. 


कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आळशीही फायदेशीर आहे. आळशी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते तसेच आळशी उर्जेचाही उत्तम स्त्रोत आहे. हिरव्या भाज्यांचं जेवणात जितकं सेवन कराल तितका फायदा होतो. हिरव्या भाज्यांमध्ये असणारे खनिजे, विटॅमिन, फायबर रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही. त्यामुळे हृदय आणि किडणीच्या आजारांपासून बचाव होतो.


एक कप गरम पाण्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबूचा रस पिण्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.


एक ग्लास पाण्यात २ चमचे धणे उकळून ते पाणी दिवसांतून दोन वेळा पिण्यानेही फायदा होतो.


कांद्याचा रस केवळ कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करत नाही तर रक्त शुद्ध करुन हृदयाचं आरोग्यही चांगलं ठेवते.


मेथीच्या दाण्यांच्या नियमित सेवनाने तसंच लसनाच्या सेवनानेही कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदा होतो. 


आहारात विटॅमिन ई, विटॅमिन बी, सोयाबीन ऑईल, ऑलिव्ह ऑईल, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करा. 


मटण, दूध, बटर, आइस्क्रिम, क्रीम यांचे सेवन कमी करा. माव्यापासून बनलेली मिठाई स्लो पॉइजनच काम करतात त्यामुळे त्यांचे सेवनही अतिशय कमी करा. सिगारेट, दारूचे सेवन करु नका.