मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. आजकाल अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत बेली फॅट कमी करणं हे प्रत्येकाचं ध्येय बनलं आहे. बेली फॅटमुळे मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात आणि अगदी कर्करोग यांसारख्या अनेक आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहारातील बदल आणि रोजचा व्यायाम हा बेली फॅटपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे. पण यानंतरही बेली फॅट कमी होण्याचं नाव घेत नसेल तर त्यासोबतच इतर काही गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागेल. चला जाणून घेऊया काही नैसर्गिक उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही बेली फॅट कमी करू शकता.


साखर बंद करा


साखरेमध्ये कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं जे आपल्या शरीरात वजन वाढवण्याचं काम करतं. म्हणूनच पांढऱ्या साखरेपासून दूर राहणं फायदेशीर ठरेल. मात्र फळांमध्ये असते तशी साखर नैसर्गिक स्वरूपात खाणं चांगलं आहे. याशिवाय तुम्ही मध किंवा गूळाचा वापर करू शकता.


अधिक पाणी प्या


पाणी हे आपल्या जीवनाचं अमृत आहे. अतिरिक्त चरबीपासून मुक्त होण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी पर्याय आहे. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यायलं पाहिजे. असं केल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि वजन कमी करण्यास मदत होईल.


कोमट पाणी आणि लिंबू


बेली फॅटपासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. तुम्ही त्यात मधही घालू शकता. हे केवळ लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी ठरत नाही तर चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर ठरण्यास मदत होते.


आहारात धान्याचा समावेश


संपूर्ण धान्य म्हणजे चांगलं फायबर, अधिक पोषण, प्रोटीन आणि कॅल्शियमचे सेवन. अधिक फायबरचे सेवन केल्याने तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते.