मुंबई : जेव्हा एखादी नवीन वस्तू घरात येते तेव्हा आपण अनेकदा त्याच्या पॅकिंगमध्ये वापरलेलं बबल रॅप फेकत नाहीत. बहुतेकांना त्या रॅपचे बबल फोडण्यास आवडतं. मुख्य म्हणजे यासाठी वयस्कर लोकंही मुलांप्रमाणे वागतात. पण तुम्हाला माहित आहे का या मागचं कारण काय आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व वयोगटातील लोकं स्वतःला बबल रॅप फोडण्यापासून का थांबवू शकत नाहीत? आज आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत. यासह, आम्ही तुम्हाला बबल रॅप फोडण्याचे फायदे देखील सांगणार आहोत.


एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, जेव्हाही आपल्या हाती कोणतीही स्पंजसारखी मऊ वस्तू येते, तेव्हा आपल्या हातात काही प्रमाणात पॅनीक होतात. ज्यामुळे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि ती गोष्ट फोडायला भाग पडतो.


जेव्हा आपण कोणत्याही तणावाखाली असतो, तेव्हा अशा परिस्थितीतही स्पंजसारख्या गोष्टींना धरून ठेवणं खूप दिलासादायक असतं. म्हणजेच, लहान वस्तू पॅक करणारा बबल रॅप फोडून तणाव दूर होतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, बबल रॅप फोडणं तणावाची पातळी कमी करण्यास मदत करतं. बबल रॅप फोडणारे लोक सामान्य लोकांपेक्षा अधिक सक्रिय आणि उत्साही असतात.


एकदा का बबल रॅप फोडण्यास फोडायला सुरुवात करत त्यावेळी आपल्याला ते सतत करत रहावसं वाटतं ही चांगली गोष्ट आहे. असं केल्याने, तणावापासून दूर राहण्याबरोबरच, एका ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं. जेव्हा अंगठा आणि पहिलं बोट एकत्र जोडून रॅपचा प्रत्येक बुडबुडा एकामागून एक फोडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा हे प्रत्यक्षात फायदेशीर असतं.


एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, बबल रॅप इतके आकर्षक आहेत की ते कोणाचंही लक्ष वेधून घेतात. मानसिक आरोग्यासाठी बबल रॅप एक उत्तम ध्यान साधना म्हणून वापरू शकता.


सीलबंद एअर कॉर्पोरेशनने केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, 1 मिनिटांचा बबल रॅप तणावाची पातळी 33 टक्क्यांनी कमी करतो. आणि हे मानसिक आरोग्यासाठी फार उत्तम आहे.