मुंबई : लग्नानंतर वजन वाढणे हे साहजिक आहे. इतकंच नव्हे तर लग्नानंतर वजन वाढणे हा एक चांगला संकेतही मानला जातो. अनेकांना असे वाटते की लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवल्याने वजन वाढते. मात्र हकीकत वेगळीच आहे. 


ही कारणे आहेत वेगळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक लोकांना अस वाटते की लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवल्याने वजन वाढते. कारण शारिरीक संबंध ठेवल्याने महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. मात्र याबबतचा अद्याप कोणताही स्टडी समोर आलेला नाहीये. 


लग्नात प्रत्येक मुलीला वाटते की आपण स्लिम आणि सुंदर दिसावे. यामुळे लग्न ठरल्यानंतर अनेक मुली आपले वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयोग करतात. जिममध्ये जाऊन घाम गाळतात. मात्र लग्नानंतर महिला आपल्या जीवनात इतक्या व्यस्त होतात की स्वत:वर लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. अचानक बदललेल्या लाईफस्टाईलनेही वजन वेगाने वाढते.


लग्नानंतर वजन वाढण्याचे एक कारण म्हणजे जोडप्यांचे एकमेकांवरील प्रेम. २०१३मध्ये प्रकाशित झालेल्या हेल्थ सायकॉलॉजी आर्टिकलमध्येही हेच सांगण्यात आले होते की ज्या जोडप्यांना आपल्या जोडीदाराप्रती प्रेमाची भावना, सुरक्षा आणि आनंद वाटतो त्यांचे वजन वेगाने वाढते. 


लग्नानंतर केवळ महिलांचेच वजन वाढते अशी साधारण धारणा असते. मात्र असे नाहीये. लग्नानंतर ज्या वेगाने महिलांचे वजन वाढते तितक्याच वेगाने पुरुषांचेही वजन वाढते.