मुंबई : आपण अजून किती वर्ष जगणार आहोत हे, जर तुम्हाला कळलं तर नक्कीच अनेकांना आयुष्याचं नियोजन करणं सोपं जाईल. पण असं शक्य नाही, हेच तुमच्या मनात आलं असेल. मात्र आम्ही तुम्हाला आता सांगितलं की हे शक्य आहे तर.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विज्ञानाने या दिशेने प्रगती केली आहे. हायटेक चाचणी अंतर्गत, केवळ लाळेचा नमुना घेऊन एखाद्या व्यक्तीचे जैविक वय सांगण्याचा दावा करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे व्यक्तीच्या आयुष्यातील उरलेल्या वर्षांचा अचूक अंदाज लावता येतो, असं सांगण्यात आलं आहे. एक कंपनी ही चाचणी देत असून ज्याची जगभरात चर्चा होत आहे.


द सनच्या माहितीनुसार, एलिसियम हेल्थ नावाची कंपनी जैविक वयाची चाचणी $ 499 (सुमारे 39,486 रुपये) देत आहे. चाचणी दरम्यान, ते ग्राहकाच्या डीएनएमध्ये 100,000 पेक्षा जास्त 'मिथिलेशन पॅटर्न' तपासते. या चाचणीने वृद्धत्व थांबवता येत नाही, परंतु एखादी व्यक्ती आपल्या भविष्याविषयी काही गोष्टी ठरवू शकते आणि त्यांचे चांगले नियोजन करू शकते.


या चाचणीतून एखाद्या व्यक्तीला जगण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे याची अचूक कल्पना येऊ शकते. चाचणी रुग्णाच्या पेशींचं 'टेलोमेरेस' मोजते. या DNA एक्‍पेंडेबल कॅप्‍स आहेत, ज्या जेव्हा पेशींची प्रतिकृती बनवतात तेव्हा बंद होतात. 


वयानुसार टेलोमेरची लांबी कमी होते. त्यामुळे म्हातारपणाची आणि रोगाला बळी पडण्याची चिन्हं दिसू लागतात.