Home Remedies to Control Bad Cholesterol : बदलेली जीवनशैली आणि बाहेरच्या खाण्यापिण्याचा वाढलेला परिणाम मानवाच्या शरीरावर दिसतोय. खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतंय. गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण वाढलंय. आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल आणि चांगलं कोलेस्ट्रॉल असतं. यातील खराब कोलस्ट्रॉलचं प्रमाण वाढली की चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. शरीरातील नसांमध्ये घाण जमा होते आणि त्याचा परिणाम तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता वाढवतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते तेव्हा शिरांच्या आतील भिंतींमध्ये मेणासारखा चिकट पदार्थ जमा होण्यास सुरुवात होते. या चिकट पदार्थामुळे रक्तवाहिनीतील रक्ताचा वेगही मंदावतो आणि त्याचा परिणाम हृदयापर्यंत पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचत नाही. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. 


उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणं काय?


जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा बाह्य स्तरावर कोणतीही मोठी लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र शरीराच्या आतल्या भागात नुकसान होतं आणि अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या वाढतात. जर तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटतं. श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या आणि हृदयावर दाब यासारख्या समस्या जाणवतात. 


ही लाल चटणी ठरते फायदेशीर!


वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि त्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी तुम्ही खास घरगुती चटणीचं सेवन करु शकता. या लाल रंगाच्या चटणीमध्ये अशा गोष्टी असतात ज्या नैसर्गिकरित्या खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. या चटणीचे सेवन केल्याने केवळ खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होत नाही तर रक्त घट्ट होण्यापासूनही मदत मिळते. त्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने सुरू राहते. 


कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी लाल चटणी कशी बनवायची?


कच्च्या लसूणच्या 2 पाकळ्या आणि त्यात जुना गूळ घेऊन त्या ठेचून घ्या. याची चव वाढविण्यासाठी यात ताजी लाल मिरची ठेचा. हे सर्व नीट बारीक केल्यानंतर त्यात काळे मीठ चवीनुसार टाका. ही लाल चटणी तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. 


लसूण गुळाची चटणी खाण्याचे इतर फायदे


मज्जातंतूंना आराम मिळते आणि त्यांचे कार्य वाढण्यास मदत मिळते.


रक्तवाहिन्यांचे आकुंचन कमी होऊन रक्ताभिसरणही वाढ होते. 


लसूण खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरते. 


लसणात असलेल्या घटकांच्या नैसर्गिक रक्त पातळ करण्यात फायदेशीर ठरते. 


मात्र जर तुम्ही कुठले औषधं घेत असला किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या चटणीचे सेवन करु नका. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)