Health Tips : हिवाळ्यात `हे` Soup तुमच्या आरोग्याची घेईल काळजी, जाणून घ्या रेसिपी
हिवाळ्यात हे सूप घेतील आरोग्याची काळजी, जाणून घ्या सोप्या रेसिपी
Warm winter Health Tips : हिवाळा (winter) सुरु झाला आहे. अशात अनेक लोक सूप (Soup) पिताना दिसतात. वेगवेगळ्या भाज्यांचे सूप चवदार आणि पोषक तत्वाने भरलेले आसतात. हिवाळ्यात भाज्यांचे सूप उबदारपणासाठी फायदेशीर असतात. हे केवळ चवीलाच चांगले नसतात, तर त्यामध्ये असलेले अनेक पोषक घटक आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर (Health Tips) असतात. मोठे किंवा लहान मुले सर्वांना सूप प्यायला आवडते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 सूप रेसिपी सांगणार आहोत ज्या तुम्ही हिवाळ्यात बनवू शकता. (This soup will take care of your health in winter know the recipe nz)
1. बदाम आणि मशरूम सूप (Almond and mushroom soup)
हिवाळ्यात मशरूम मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे तुम्ही मशरूममध्ये बदाम मिसळून सूप देखील बनवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मशरूम मिक्सरमध्ये हलके पीसून आणि पाण्यात उकळूनही सूप बनवू शकता. चव वाढवण्यासाठी तुम्ही सूपमध्ये बदाम, लोणी, काळी मिरी, क्रीम वापरू शकता.
2. टोमॅटो आणि जास्मिन टी सूप (Tomato and Jasmine Tea Soup)
टोमॅटोचे सूप हिवाळ्यात खूप खाल्ले जाते, पण त्यात चमेलीचा चहा मिसळला तर सूपची चव वाढते. जसे टोमॅटोचे सूप बनवतात तसाच सूप बनवा, त्यात थोडा चमेलीचा चहा आणि काळी मिरी घालून उकळा. जर तुम्हाला जास्त मसाले घालायचे असतील तर तुम्ही ते घालू शकता.
हे ही वाचा - Optical Illusion : 'या' फोटोत छत्री शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ
3. मुलिगनचे सूप (Mulligatawny Soup)
हे अँग्लो इंडियन सूप आहे. हे अतिशय चवदार सूप आहे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात चिकनचा वापर केला जातो. चिकनबरोबरच त्यात भाज्याही टाकल्या जातात. या हिवाळ्यात तुम्ही पौष्टिक घटकांनी बनवलेले हे सूप जरूर ट्राय करा.
4. बीटरूट सूप (Beetroot Soup)
तुम्ही हिवाळ्यात बीटरूट सूप बनवू शकता. हे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते. सूप क्रीमी बनवण्यासाठी तुम्ही क्रीम वापरू शकता. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात कांदे आणि टोमॅटोही मिक्स करू शकता.
5. गाजर सूप (Carrot soup)
हिवाळ्यात आपण गाजराचा हलवा खातो पण यावेळी तुम्ही गाजर सूप जरूर ट्राय करा. सूप चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात आले, लसूण आणि काळी मिरीही घालू शकता. हे सूप हिवाळ्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते बनवायला देखील सोपे आहे, म्हणून या हिवाळ्यात आम्ही सांगितलेले हे सूप वापरून पहा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)