Belly Fat कमी करण्यासाठी `हे` सूपरफूड्स करतील मदत
सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण फीट राहण्यासाठी प्रयत्न करतो.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण फीट राहण्यासाठी प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत अनेकांना वर्कआऊट करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न असतो की, फीट कसं राहायचं. यासाठीच आम्ही तुम्हाला आज काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होऊ शकते.
बेली फॅट कमी करण्यासाठी हे पदार्थ खा
बदाम
तुम्हाला माहितीये का बदाममध्ये भरपूर न्यूटिएंट्स आणि विटामिंन्स असतात. जर तुम्ही दिवसाला 5-6 बदाम खाल्लेत तर तुमच्या भूक कमी लागते. शिवाय तुम्हाला पुरेशी उर्जा मिळण्यासंही मदत होते.
सफरचंद
असं म्हणताता सफरचंद खा आणि डॉक्टरपासून दूर रहा. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, तुमचं वजन कमी करण्यासाठी सफरचंद फायदेशीर आहे. एका सफरचंदात 4 ते 5 ग्रॅम फायबर असतं, जे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागण्यापासून दूर ठेवू शकतं.
दालचीनी
तुमच्या जेवणात किंवा चहामध्ये साखरेऐवजी दालचिनी घाला. यामुळे तुमच्या इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित राहील आणि तुमचा लठ्ठपणाही कमी होण्यास मदत होईल.
अंड्याचा पांढरा भाग
जर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भाग खाल्ला तर तुमचं वजन खूप कमी होऊ शकतं. यामध्ये प्रोटीन असतात आणि याच्या सेवनाने जास्त वेळ भूक लागत नाही. सकाळी नाश्त्यात अंडी खाणं हा एक चांगला पर्याय आहे.