मुंबई : यंदाच्या वर्षी मकर संक्रांत १५ जानेवारी रोजी आली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी संक्रांतीची तयारी सुरू आहे. या दिनाचे औचित्य साधत प्रत्येकाच्या घरी तिळाच्या लाडू्ंचा बेत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने पाढंऱ्या, काळ्या आणि लाल तीळांचा समावेश होतो. यापैकी पांढऱ्या तिळांचा आहारामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. तीळ हा प्रामुख्याने उष्ण पदार्थ असल्यामुळे हिवाळ्यातील उष्ण वातावरणात शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ उपयोगी ठरतात.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ फार लाभदायक आहे. तिळामध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात. तीळ बारीक करून खाल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी गुळ आणि तीळ एकत्र करून त्याचे लाडू तयार करण्यात येतात.


तिळामध्ये  कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम इत्यादी हृदयासाठी फायदेशीर असतात. तसेच जेवण तयार करताना तिळाच्या तेलाचा वापर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.


त्वचेसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व तिळात आढळून येतात. शरीराच्या एखाद्या ठिकाणी भाजल्यावर तीळ बारीक करून तूप आणि कापूर यांची तयार पेस्ट जखमेवर लावल्याने आराम मिळतो. 


अशा प्रकारे तिळगूळ आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. मकर संक्रांत १५ जानेवारी रोजी म्हणजे बुधवारी असणार आहे. या दिवशी एकमेकांना 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं म्हणत तिळगुळ आणि फुटाणे दिले जातात. मनातील सर्व राग रुसवा दूर करण्याकरता हा सण अतिशय आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलांच बोरनान देखील केलं जातं.