मुंबई : एखादी व्यक्ती आजारी पडण्याचे कारण म्हणजे त्याच्या सवयी. आयुर्वेदानुसार माणसाच्या अधिकांश आजारांचे कारण त्याच्या लहान लहान सवयी होत. रोजच्या दिनक्रमाशी संबंधित असे काही नियम आहे ज्याचे नियमित पालन केल्यास ती व्यक्ती निरोगी राहू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याप्रमाणे शरीराला योग्य प्रमाणात आहाराची गरज असते त्याचप्रमाणे शरीराला पुरेशी झोप आवश्यक असते. निरोगी आरोग्यासाठी व्यक्तीला सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. 


भरपूर जेवल्यानंतर त्यावर एक ग्लास गरम पाणी पिणे आवश्यक असते यामुळे पचनशक्ती वाढते. त्याचबरोबर स्किनही ग्लो करते. 


दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत होते.


चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम गरजेचा. दिवसातील किमान अर्धा तास व्यायाम केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो.