टाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे? `हे` 5 उपाय करतील मदत
पायाच्या भेगा पडायला सुरुवात झाल्यावर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुंबई : हवामानातील बदलामुळे आरोग्यावर आणि त्वचेवरही परिणाम दिसून येऊ लागतो. यामध्ये पायाला भेगा पडण्याची समस्याही उद्भवते. त्यामुळे पायाची आग होणं, पाय जळजळणं या त्रासांनाही सामोर जावं लागतं. पायांच्या भेगांवर वेळीच उपचार करणं शक्य आहे. पायाच्या भेगा पडायला सुरुवात झाल्यावर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्या लोकांना ही समस्या अधिक आहे. त्यांना पाय दुखणं आणि रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
या उपायांनी टाचेला पडणाऱ्या भेगांवर उपचार करा
नारळाचं तेल
नारळाच्या तेलाचा नियमित वापर केल्याने टाचांच्या भेगांची समस्या दूर होते.
यासाठी रात्री झोपताना भेगा पडलेल्या ठिकाणी तेल लावा. गरज वाटल्यास तेट कोमट करूनही तुम्ही लावू शकता.
रात्री झोपताना मोजे घालू झोपा आणि सकाळी उठल्यानंतर पाण्याने पाय धुवून टाका
एप्पल सायडर विनेगर आणि लिंबाचा रस
एप्पल सायडर विनेगर टाचेला भेगा पडण्याची समस्या दूर करण्यात मदत करते. जर यात लिंबाचा रस मिक्स केला गेला तर त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. या दोन्हीमध्ये अँटी-इंफ्लामेटरी आणि आम्लीय घटक असतात. जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात.
एका भांड्यात 3 लीटर पाण्यामध्ये लिंबाचा रस घाला
पाणी कोमट झाल्यावर त्यामध्ये एपल्ल सायडर व्हिनेगर घाला
या पाण्यात किमान 15 ते 20 मिनिटं पाय बुडवून ठेवा
कोरफड आणि ग्लिसरीन
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरफडमध्ये हायड्रेटिंग आणि उपचार हा गुणधर्म असतो. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. त्यात ग्लिसरीनचा वापर केल्यास पाय चांगले मॉइस्चराईझ केले जातात. हे कोरडे आणि भेगा पडलेल्या त्वचेसाठी प्रभावी आहे.
2 चमचे कोरफडीच्या जेलमध्ये एक चमचा ग्लिसरीन घाला
गरम पाण्याने पाय धुवून या मिश्रणाने पायाला मसाज करा