मुंबई : डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक भाग. त्याचे जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजकाल तासंतास आपण मोबाईल, कंम्प्युटर स्क्रिनवर असतो. त्यामुळे डोळ्यांचे विकार, इंफेक्शनचे प्रमाण तसे वाढलेले दिसते. त्याचबरोबर बाहेरील वातावरण त्याचाही डोळ्यांवर परिणाम होतो. धूळ, प्रदूषण यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडते किंवा इंफेक्शनला सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात तर हे प्रमाण अधिक वाढते. म्हणूनच  डोळ्यांचे इंफेक्शन दूर ठेवण्यासाठी काही खास टिप्स. तुम्हालाही उन्हाळ्यात होतो का हा त्रास? मग नक्की ट्राय करुन पहा या सोप्या टिप्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. डोळे जोरजोरता चोळू नका. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही ट्रॉप्स डोळ्यात घालू नका.


#2. डोळे नेहमी स्वच्छ ठेवा आणि घाणेरडे हात डोळ्यांना लावू नका.


#3. डोळ्यांना खाज येत असल्यास किंवा डोळे लाल झाले असल्यास डोळे साधारण कोमट पाण्याने धुवा.


#4. बाहेर जाताना पोलराईज ग्लासेस घाला. त्यामुळे प्रखर सुर्यकिरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होईल आणि डोळ्यांना थंडावा मिळेल.