मुंबई : पुरेशी झोप घेतल्यानंतरही ऑफिसमध्ये सुस्तावल्यासारखे वाटते का? तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव असेलही. आणि जर नसलास तर तुमच्या आसपासच्या लोकांना तरी तुम्ही ऑफिसमध्ये डुलकी घेताना पाहिले असेल. यापैकी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. पुरेशी झोप घेऊनही ऑफिसमध्ये झोप येत असल्यास याचा थेट परिणाम कामावर होतो. तर तुमची ही समस्या दूर करण्यासाठी या काही टिप्स...


दिवसभर पाणी प्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरेसे पाणी न प्यायल्यास आवश्यक तितकी झोप घेऊनही तुम्हाला सुस्तावल्यासारखे वाटते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये पूर्ण वेळ फ्रेश राहायचे असेल तर दिवसातून कमीत कमी १० ग्लास पाणी प्या.


हेव्ही जेवण टाळा


ऑफिसमध्ये असताना दुपारचे जेवण हलके असणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे आळस येणार नाही. परिणामी नकळत येणारी झोपही टाळता येईल. दुपारच्या जेवणात ताक, सलाड यांचा समावेश करा.


चॉकलेट


काम करताना थकल्यासारखे वाटत असेल तर जवळ चॉकलेट ठेवा. थकवा, सुस्ती जाणवल्यास चॉकलेट खा. त्यामुळे शरीराला इंस्टेंट एनर्जी मिळेल. त्याचबरोबर ताण दूर होण्यासही मदत होईल.


व्यायाम करा


रोज सकाळी न चुकता व्यायाम करा. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि अॅक्टीव्ह रहाल. 


चहा आणि कॉफी घेणे टाळा


चहा-कॉफी घेतल्याने सुस्ती दूर होते, असा अनेकांचा समज आहे. परंतु, हे काही नाही. चहा घ्यायचा असल्यास ग्रीन टी घेणे फायद्याचे ठरेल. सकाळी तुळस घातलेला चहा अवश्य घ्या.