मुंबई : खाण्यापिण्यावर ' डाएट' च्या नावाखाली बंधनं न घालता, सारे आरोग्यदायी पदार्थ चाखून वजन आटोक्यात ठेवायचे काम जरा कठीणच आहे. पण खाण्याची काही बंधनं पाळल्यास आरोग्य आणि वजन दोन्ही जपणं शक्य आहे. मात्र त्यासाठी काही खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा आवडीचा पदार्थ अधिक खाल्ला जातो. परंतू यामुळेच वजनाचं गणित बिघडते. म्हणून कटाक्षाने या टीप्स लक्षात ठेवा.  


१.  जेवणापूर्वी किमान ३० मिनिटं आधी ग्लासभर पाणी प्यावं. यामुळे कॅलरीयुक्त पदार्थावर ताव मारण्याची  इच्छा कमी होते. अर्धातास आधी शक्य नसेल तर किमान तासभर आधी पाणी प्यावे. 


२.  तुम्ही बाहेर जाऊन जेवणार असाल तर प्रोटिन पॅक्ड पदार्थांची निवड करा. हे पदार्थ पोटभरीचे असल्याने हाय कॅलेरी पदार्थांकडे तुमचे लक्ष जाणार नाही.  


३.  रात्री उशीराचे जेवण टाळा. रात्री उशीरा जेवणाची सवय असणार्‍यांमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक खाण्याची सवय लागते. झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवणे गरजेचे आहे. जेवलेले अन्न पचायला पुरेसा वेळ द्या. 


४.  जेवताना लहान प्लेट आणि वाटीची निवड करा. यामुळे तुमचा पोर्शन कंट्रोल राहतो. लाल रंगांची प्लेट असणार्‍यांना अधिक खाण्याची  इच्छा होते. 


५.  दिवसभरात दोन वेळेस  भरपूर जेवण्याऐवजी काही तासांनी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने जेवायची सवय ठेवा. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारायला मदत होते. दोन जेवणामध्ये काही खाण्याची सवय असल्यास ओव्हर इटिंगच्या खाण्यावर कंट्रोल राहतो.