मुंबई : होमिओपॅथी हा देखील वैद्यशास्त्रातील एक पर्याय आहे. अनेक जुनाट आजारांना नष्ट करण्यासाठी होमिओपॅथीकडे एक प्रभावी उपचारपद्धती म्हणून पाहिले जात आहे. परंतू त्याचा प्रभाव अधिक सकारात्मक दिसावा म्हणून होमिओपॅथीचं औषध घेताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅलोपॅथीचं औषध अनेकांना त्रासदायक ठरतात. दूरगामी होणारे त्याचे परिणाम आटोक्यात ठेवत आजारावर उपचार करण्यासाठी होमिओपॅथी फायदेशीर ठरते. 


होमिओपॅथीची औषध घेताना कोणती काळजी घ्याल? 


कशी ठेवाल औषधं ? 


होमिओपॅथीची औषध कशा स्वरूपात ठेवतात यावर त्याचा प्रभाव अवलंबून असतो. होमिओपॅथीची औषध अति थंड  किंवा गरम वातावरणामध्ये साठवू नका. औषध घेतल्यानंतर डबी नीट बंद करा. त्यामधील इसेन्समध्येच औषधाचा प्रभाव असतो. 


हात लावू नका - 


होमिओपॅथीच्या गोळ्या हा साबुदाण्याच्या आकारामध्ये असतात. डॉक्टर तुम्हांला समस्येनुसआर त्यावर औषध टाकून देतात. त्याचा इसेन्स टिकून रहावा म्हणून त्या थेट घेणं फायद्याचं आहे. गोळ्या हातावर घेऊन तोंडात टाकण्यापेक्षा बाटलीच्या झाकणावर घेऊन तोंडात टाका. 


खाण्याबाबतचं पथ्यपाणी 


सामान्यपणे औषध घेण्यापूर्वी पुरेसे जेवण्याचा नियम असतो. मात्र होमिओपॅथी याला अपवाद आहे. होमिओपॅथीची औषध घेताना तुम्ही  किमान अर्धातास आधी आणि नंतर काहीही खाऊ नये असा सल्ला दिला जातो. एखादा पदार्थ खाल्ल्यने औषधाचा परिणाम कमी होतो. 


काय खाऊ नये ?  


होमिओपॅथीची औषध घेताना काही पदार्थ खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. अल्कोहल,सिगारेट, तंबाखूचं सेवन टाळा. आहारात लसूण, कांदा टाळा. होमिओपॅथीचं औषध सुरू असताना आहाराचं पथ्यपाणीही सांभाळा.