मुंबई : डोकेदुखीचा त्रास हा कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकालाच असतो.  काहींमध्ये डोकेदुखी हे एखाद्या गंभीर आजाराचे एक लक्षण असू शकते. तर काहींमध्ये पित्तं, सर्दी, मायग्रेन यांमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. तर आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीही डोकेदुखीस आमंत्रण देते. अनेकजण डोकेदुखीवर उपाय म्हणून पेनकिलर्स घेण्याचा मार्ग निवडतात. मात्र पेनकिलरमुळे तात्काळ आराम मिळत असला तरीही त्याचे दुष्पपरिणामही होतात. मग झटपट डोकेदुखी दूर करण्यासाठी करून पहा हे सह्ज, सोपे  उपाय.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    डोके दुखत असल्यास अधिकाधिक आराम करा.

  • डोक्यावर बर्फ किंवा थंड पट्ट्या ठेवा.

  • गरम पाण्याने अंघोळ केल्यासही डोकेदुखीवर फायदा होतो.

  • तेल मालिश करा.

  • दिवसभरात एक-दोनदा खूप खाण्यापेक्षा काही वेळाच्या अंतराने थोडे थोडे खा.

  • खूप अधिक दारुचे सेवन डोकेदुखी वाढवेल. त्यामुळे शक्यतो ते टाळा.

  • भरपूर पाणी प्या.

  • मायग्रेन असल्यास तणाव कमी करा. तणावामुळे डोकेदुखी वाढते.