मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा आरोग्यावर तर परिणाम होतोच. पण केस आणि त्वचाही या उन्हाच्या तडाख्यातून सुटत नाहीत. अगदी ओठही. उन्हाळ्यात ओठ कोरडे होत असतील तर या कूल टिप्स फायदेशीर ठरतील.


माईश्चराईजर लावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात ओठ कोरडे होऊ नयेत म्हणून माईश्चराईजर लावा. त्यामुळे लिप्स हायड्रेड राहतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लीपबामही वापरू शकता.


एसपीएफ युक्त लीपबाम वापरा


प्रखर उन्हापासून ओठांचे संरक्षण करण्यासाठी एसपीएफ युक्त लीपबाम लावण्याची गरज आहे. यासाठी लिपबाम १५ किंवा त्यापेक्षा अधिक एसपीएफयुक्त असणे गरजेचे आहे.


सकाळी ब्रश करताना


सकाळी दात घासून झाल्यावर ओठांवरुनही ब्रश फिरवा. त्यामुळे ओठांवरील ड्राय व मृत त्वचा निघून जाईल आणि ओठांजवळील रक्तप्रवाह सुधारेल.


व्हिटॉमिन ए युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा


व्हिटॉमिन ए युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारेल आणि ओठांची त्वचाही मुलायम होईल. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, टॉमेटो, गाजर अशा पदार्थांचा समावेश करा.