क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भारतातील सर्वात मोठा पुतळा

नाशिकमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. 

Sep 30, 2024, 19:50 PM IST

Nashik savitribai Phule and Mahatma Phule Statue : क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठा पुतळा आपल्या महाराष्ट्रात उभारण्यात आला आहे. नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या या भव्य दिव्य पुतळ्याचे नुकतेच लोकापर्ण झाले. 

1/7

नाशिकचं प्रवेशद्वार असलेल्या मुंबई नाका इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे. 

2/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.   

3/7

 हे स्मारक उभारण्यासाठी 4 कोटी 68 लाखांचा खर्च आला.  हा पुतळा अतिशय भक्कम होण्यासाठी 8 फुट कॉंक्रीटचा चौथरा उभा करून त्याला ग्रेनाईट लावण्यात आले आहे. 

4/7

जवळपास 2710 मीटर जागेवर हे स्मारक उभारण्यात आले आहे. महात्मा फुले यांचा 18 फुट उंच तर सावित्रीमाई फुले यांचा 16.5 फुट उंच पुतळा आहे. या दोन्ही पुतळ्यांची रुंदी प्रत्येकी 14 फूट आहे.

5/7

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभारण्यात आला आहे. कोकणातील कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ यांनी हा पुतळा उभरला. यासाठी 11 महिन्यांचा कालावधी लागला.

6/7

फुले दाम्पत्यांचे देशातील हे सर्वात मोठे ब्रान्झ धातूचे शिल्प सर्वांना हेवा वाटावा असेच आहे. 

7/7

फुले दांपत्याचे कार्य समाजापर्यंत पोचवण्यासाठी तसेच ते रुजविण्यासाठी नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात स्मारक उभारण्यात आले आहे.