मुंबई : सर्वांगीण आरोग्याचा विचार केल्यास त्यात तोंडाच्या आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे. आपण सतत काही ना काहीतरी खात असतो. अशावेळी नकळत आपले दातांच्या तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरतील.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी दररोज दात स्वच्छ घासणे, फ्लॉस करणे गरजेचे आहे. दाताच्या फटीत अडकलेले जे अन्नकण ब्रश केल्याने निघत नाहीत, त्यासाठी फ्लॉस करणे आवश्यक आहे. ब्रश आणि फ्लॉस करण्याबरोबरच जीभ स्वच्छ करणे देखील गरजेचे आहे. 


२. दात आणि हिरड्यांमधील भागाला बोटांनी  मसाज करा. मसाज करताना बोटं गोलाकार फिरवा. त्यामुळे तोंडातील अन्नकण बाहेर पडण्यास मदत होईल व त्याचबरोबर रक्तप्रवाह सुधारून दात व हिरड्यांची क्षमता वाढेल.


३. दिवसातून दोनदा दात घासणे गरजेचे आहे. काही खाल्या किंवा प्यायल्यानंतर दातांवर प्लागचा पातळ थर तयार व्हायला सुरवात होते. यामुळे खराब होऊन दात किडू लागतात.  तोंडात तयार होणारी लाळ या अॅसिडशी सामना करते. परंतु, रात्रीच्या वेळी आपले तोंड खूप वेळ बंद असते त्यामुळे तोंडात लाळ कमी प्रमाणात किंवा तयारच होत नाही. म्हणून प्लाग घालवण्यासाठी झोपण्यापूर्वी ब्रश करणे गरजेचे आहे. 


४. तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी चांगल्या माऊथवॉशने गुळण्या करणे महत्त्वाचे आहे. बहुतेक माऊथवॉश मध्ये फ्लोराईड असतं व ते dental caries कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे काही खाल्यानंतर किंवा दिवसातून दोनदा चांगल्या माऊथवॉशने अवश्य गुळण्या करा. 


५. बऱ्याच लोकांना हे महत्त्वाचे वाटत नाही. पण जिभेवर अनेक ओरल बॅक्टरीयाची उत्पत्ती होत असते. म्हणून फक्त ब्रश करणे पुरेसे नाही. तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी नियमित डेंटल चेकअप करणे महत्त्वाचे आहे.