Health News : अनेकजणांना दात घासायचा कंटाळा असतो, तर काहीजण उशिरा उठतात त्यामुळे घाईघाईत दात घासतात. मात्र जेव्हा दातदुखी सुरू होते त्यावेळी काही सुचत नाही. कारण दातांना तशा कळाच बसतात. दातदुखीमुळे कोणत्याही कामात किंवा गोष्टीत आपलं लक्ष लागत नाही. मात्र दातदुखीवर काही घरगुती उपाय आहेत ज्याने तुमची दातदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाकघरातील सर्वात सहज उपलब्ध होणारा लसूण. त्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे बॅक्टेरिया नष्ट करू शकतात. तुम्ही लसूण चहा बनवू शकता. वेदनादायक भागावर तुम्ही लसूण पेस्ट देखील लावू शकता. लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.


कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या करणं, हे माउथवॉशचं काम करतं. मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याने दातदुखीपासून आराम मिळतो. गुळण्या करताना मीठाचं पाणी थुंकण्याआधी ते कमीत कमी 30 सेकंद तोंडात ठेवा जेणेकरून तुमची दातदुखी कमी होण्यास मदत होते.
 
दातदुखीवर कांदा अतिशय उत्तम सोपा उपाय आहे. जेवणात दररोज कांद्याचं सेवन करणाऱ्यांना दातदुखीची त्रास तुलनेने कमी होतो. कांद्यामध्ये असणारे गुणधर्म दातातील किटाणू नष्ट करतात. दात दुखत असल्यास कांद्याचे काही तुकडे दाताखाली ठेवावेत किंवा कांदा चावावा. काही वेळाने आराम मिळू लागतो.


पुदिनाने दातदुखी, हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.  तुम्ही पेपरमिंट तेल वापरू शकता किंवा दातावर थोडी उबदार पेपरमिंट टी बॅग ठेवू शकता.



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)