मुंबई : चांगल्या झोपेसाठी योग्य प्रकारे आहार घेणे महत्त्वाचे असते. तज्ञांच्या मते खाण्यावर अनेकदा चांगली झोप अवलंबून असते. बदाम, किवी, अक्रोड, केळे, काबुली चणे, दूध, भात या पदार्थांमुळे चांगली झोप येते. जे लोक दिवसभर सतत धावपळ करत असतात आणि घरी आल्यावर झोपल्यास सतत कूस बदलत असतात, झोप येत नाही अशा व्यक्तींनी आहारात काही महत्त्वाचे बदल करावेत. यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल. आपली लाईफस्टाईलमध्ये बदल करण्यासोबतच आहारतही बदल महत्त्वाचा आहे. 


रात्री भाताचे सेवन करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भातामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे भात लवकरच पचतो. त्यामुळे लवकर झोप येते. 


सलाड खाणे


रात्रीच्या आहारासोबत सलाड खाल्ल्याने लॅक्टोकेरियम स्रवते. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. 


काबुली चण्यामुळे येते चांगली झोप


काबुली चण्यात प्रोटीनचा खजाना अशतो. याशिवाय यात व्हिटामिन बी ६ असते ज्यामुळे शरीरात मेलाटोनिन वाढते.