Almond :  बदाम हे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी घरोघरी बदाम (Almond) खाले जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो. अनेक फळं (Fruits) हे सालीसकट खाल्ली जातात. सालीसकट फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial for health) असतं. पण बदाम हे सालीसकट खावं की नाही याबद्दल अनेक जणांमध्ये संभ्रम आहे. काही जण म्हणतात सालीसकट खावं तर काही जण म्हणतात सालीसकट खायला नको. मग नेमकं बदाम खाण्याची योग्य पद्धत आहे तरी काय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, मग आज आपण जाणून घेऊयात बदाम खाण्याची योग्य पद्धत कुठली आणि किती बदाम दिवसाला खाली तर चालणार आहेत. (trending news almonds soak overnight and right way to eat almond nm) 


बदाम सालीसकट खायचा की नाही?


बदामांमध्ये प्रथिने (protein), फायबर (fiber), व्हिटामिन ई (Vitamin E), कॅल्शियम (Calcium), या सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण बदाम सालीसकट खायचं की नाही याबद्दल अनेक लोकांमध्ये दुमत दिसून येतं. बदामाच्या सालीमध्ये टॅनीन (Tannin) नावाचा घटक असतो. टॅनीनमुळे बदामात असणारी उपयुक्त पोषकघटक शरीरात शोषण्यास अडथळा निर्माण होतो. सालीसकट बदाम खाल्ल्यास शरीराला काही फायदा होत नाही.त्याशिवाय बदामाचे साल पचायला खूप जड असतं. त्यामुळे जर तुम्ही सालीसकट बदाम खात असाल तर असं करू नका. कारण बदामापासून होणारे फायदे तुमच्या शरीराला मिळणार नाही. 


बदाम 'या' पद्धतीने खावे (Almonds should be eaten this way)


आता दुसरी गोष्टी बदाम खाण्याची योग्य पद्धत काय. तर बदाम कायम भिजवलेले खावे. बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात आणि त्याची साल काढण्यास सोपं जातं. रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. जर फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास तुमच्या शरीरात कॅल्शियम,झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच, कायम भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. 


दिवसाला  किती बदाम खावेत? (How many almonds to eat a day?)


रात्री 5 बदाम भिजवून (Soak almonds) ते सकाळी उठून साल काढून खावेत. नियमित प्रकारे असं केल्यास आपल्याला उर्जा मिळते. एका दिवसात 6 ते 8 बदामांपेक्षा जास्त बदाम सेवन करू नयेत, यामुळे वजन वाढू शकते आणि शरीराची उष्णता देखील वाढू शकते. 



(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)