Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य  (Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. चाणक्याने आपल्या धोरणांच्या बळावर चंद्रगुप्त मौर्यासारख्या सामान्य मुलाला सम्राट बनवले. चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) अशी अनेक धोरणे लिहिली आहेत. ज्यात जीवनात यश कसे मिळवता येईल हे सांगितले आहे. कठीण प्रसंगातून कसे बाहेर पडायचे. याशिवाय पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे. चाणक्य नीतीमध्ये असेही लिहिले आहे की, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कोणालाही सांगू नयेत. ते तुमच्यासाठी कितीही खास असो. चाणक्य नीतीमध्ये या गुप्त गोष्टी पत्नीला सांगण्यासही मनाई आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, जर तुम्हाला काही कारणाने अपमानित व्हावे लागले तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नका. काही लोकांना अशी सवय असते की, ते सर्व गोष्टी बायकोला नक्कीच सांगतात. पण अपमानाची गोष्ट तुम्ही बायकोलाही सांगू नका. कारण वेळ आल्यावर तुमची बायकोही तुमचा अपमान करु शकते.



चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti), एखाद्याने आपली कमजोरी कोणासमोरही उघड करु नये. कारण अनेक वेळा ते स्वतःहून फसतात आणि त्यावेळी ते तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांचा मुद्दा मांडू शकतात आणि मग तुम्ही इतरांसमोर खजील होऊ शकतो.



जर तुम्ही दान केले तर ते गुप्त ठेवा. आपण जे काही दान केले आहे, त्याची कधीही वाच्चता करु नये. देणगीबद्दल बायकोलाही सांगू नये. चाणक्य नीतीनुसार, दान जितके गुप्त ठेवाल तितके चांगले. दानधर्माचा उल्लेख केला तर दानाचे महत्त्व कमी होते.