Chickens Eggs Dangerous for Health: संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही जाहिरात ऐकत आपण लहानचे मोठे झालो आहेत. अंडी ही आरोग्यासाठी खूप चांगली असतात. म्हणून रोज अंडी खाली पाहिजे असे डॉक्टरदेखील सल्ला देतात. मात्र अंडीप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनामुळे तुमच्या नाश्तातील अंडे गायब होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरामध्ये पाळल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये (Eggs) पोल्ट्री फार्ममध्ये  (Poultry Farm) वाढणाऱ्या कोंबड्यांपेक्षा 40 पट जास्त शिसं (Lead)आढळून आले आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी घरात कोंबडीपालन करतात. त्यामुळे आपल्याला सहज ताजी अंडी उपलब्धत होतात. मात्र सावधान अंडी नुसती ताजी असून उपयोग नाही. कारण अंड्यांमध्ये शिसंचे प्रमाण जास्त असेल तर, त्यामुळे तुमच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, असा इशारा  WHOने दिला आहे. (trending news eggs of chickens being reared in homes can be dangerous for health poultry farm chicken eggs in marathi)


 WHO काय म्हणते?


शिसंचं प्रमाण कमी असो वा जास्त ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. जागतिक आरोग्य संघटनेचा  (WHO) च्या मते शिसंसंदर्भात निश्चित अशी सुरक्षित पातळी नाही. शिसंमुळे कमी  IQ किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजार होण्याचा धोका असतो.


संशोधनात काय समोर आलं?


ऑस्ट्रेलियामध्ये Vegesafe नावाच्या संशोधनात सुमारे 25 हजार घरगुती कोंबडीपालन करणाऱ्या कोंबड्याचे नुमने घेण्यात आले. या संशोधनात आश्चर्यचकित गोष्ट समोर आली. या संशोधनात एका कोंबडीच्या रक्तात शिसं जास्त प्रमाण आढळून आलं. त्यामुळे अंडे खाणाऱ्या लोकांमध्ये चिंता वाढली आहे. या संशोधनानुसार, 20 मायक्रोग्रॅम/ प्रति डेसीलीटर किंवा त्याहून अधिक पातळी कोंबड्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरते.तर घरगुती पालन केलेल्या 69 कोंबड्यांची चाचणी केली असता, त्यांच्यापैकी 45 टक्के कोंबड्यांच्या रक्तात (Hens Blood) शिशाचं प्रमाण 20 मायक्रोग्रॅम/डीएलपेक्षा अधिक असल्याचं आढळून आलं. 


शिसं कोंबड्यांमध्ये कसे आले?


या संशोधनात बागेतल्या मातीचं परीक्षण करण्यात आले. तसंच कोंबड्यांना दिले जाणारे आहार आणि पाणी यांचं देखील संशोधन करण्यात आले. या संशोधनात या कोंबड्यांमध्ये शिसंचं प्रमाण जास्त दिसून आले. अशातच बाजारातून घेण्यात येणाऱ्या अंड्यामध्ये शिसंचे प्रमाण  5 मायक्रोग्रॅम प्रति डेसीलिटर आढळले आहे.त्यामुळे WHO नुसार घरगुती अंड्यांपेक्षा बाजारातील अंडे सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.