ब्रेकफास्टमध्ये `हा` पदार्थ खा आणि पोटाचे आजार दूर ठेवा!
जर तुम्हाला पोटाच्या विकारापासून सुटका हवी असेल तर फक्त ब्रेकफास्टमध्ये या पदार्थाचा समावेश करा.
Health Diet : तुम्ही जर पोटाच्या (Stomach) विकाराने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. धावपळीच्या आयुष्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजाराने गाठलं आहे. त्यात सर्वात कॉमन आजार म्हणजे पोटाचे विकार (Stomach Disorders). कारण कामाच्या ठिकाणी तासंतास उपाशी राहणे, अवेळी जेवणे आणि बाहेरील खाद्यपदार्थांवर आपण मनसोक्त ताव मारतो. पण यासगळ्याचा परिणाम आपल्या पोटावर आणि आपल्या आरोग्यावर होतो. जर तुम्हाला पोटाच्या विकारापासून सुटका हवी असेल तर फक्त ब्रेकफास्टमध्ये या पदार्थाचा समावेश करा.
रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही चना स्प्राउट्स (Chana Sprouts)खाला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. चना स्प्राउट्समध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे असतात. शाकाहारी लोकांसाठी चना स्प्राउट्स खाणे हे प्रॉटीनचे बेस्ट स्त्रोत आहे. चना स्प्राउट्समध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट असतात. जे आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर असतात. चला मग जाऊन घेऊयात चना स्प्राउट्स खाल्ल्यामुळे अजून काय फायदे होतात. (trending news health benefits of eating chana sprouts in maratha)
1. हृदय निरोगी राहतं
काळ्या चनामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. अँटिऑक्सिडंटमुळे तणाव कमी करण्यास मदत होते. जर आपण काळे चने खाल्ल्यास आपलं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
2. हेल्दी केस आणि स्किन
काळ्या चनामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, जिंक आणि मँगनीज ही पोषक घटक असतात. सोबतच अँटिऑक्सिडंट या गुणधर्मामुळे आपली त्वचा आणि केस निरोगी राहण्यास फायदेशीर ठरते. शिवाय ज्या मुलींना आपले केस वाढविण्याची इच्छा आहे त्यांनी चना स्प्राउट्स खायला हवा.
3. ब्लड शुगरवर कंट्रोल
हो, चना स्प्राउट्समध्ये फायबर असल्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णांनी चना स्प्राउट्स नियमित सेवन केलं पाहिजे.
4. पंचनसंस्था निरोगी राहते
आपल्याला माहिती आहे की चना स्प्राउट्समध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे आपल्या जर पचनाशी संबंधित समस्या असतील तर तुम्हाला चना स्प्राउट्सचं सेवन केल्यास फायदा होतो. नियमित सेवन केल्यास आतडे निरोगी राहतात.
5. हाडे मजबूत ठेवतात
भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजेयुक्त असा चना स्प्राउट्स नियमित खाल्ल्यास तुमचे हाडे मजबूत होतात.
6. एकाग्रता वाढते
चणा स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन बी6 असल्यामुळे तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.