How To Clean Copper And Brass : घरोघरी आणि मंडळात सर्वत्र गणपतीच्या (Ganesh Chaturthi 2022) आगमनाची लगबग दिसून येतं आहे. गणपती-गौरीच्या पूजेअर्चेसाठी घरातील पूजेची तांबे आणि पितळीची भांडी साफ करायची म्हणजे महिलांच्या नाकीनऊ येतात. पिंताबरीने भांडी साफ करायची म्हणजे पहिले तर हात खराब होतात आणि दुसरं म्हणजे तासंतास भांडी साफ करत बसावी लागतात. देवाच्या पितळेच्या मूर्ती असो किंवा पूजेची भांडी ही हवामानामुळे काळपट पडतात. अशात झटपट ती साफ करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगणार आहोत. 


'ही' ट्रीक वापरा आणि चकचकीत करा भांडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या गणपतीमुळे घरोघरी साफ-सफाई आणि तांबे-पितळ भांडी किंवा मूर्ती या साफ केल्या जात आहेत. अशावेळी या ट्रीक महिलांना घरात खूप उपयोगी पडत आहे. खास करुन या ट्रीकसाठी बाजारातून काही विकत घेण्याची गरज नाही. घरातच असलेल्या तीन गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतात. चिंच, लिंबू आणि मीठ ही प्रत्येक घरात असते. (trending news how to clean and polish copper items in few minutes time saving tips)


प्रथम गरम गॅसवर मोठ्या भांड्यात पाणी ठेवा. त्यात चिंचेच घाला आणि त्यात लिंबाचा रस घाला. या मिश्रणात मीठ घाला आणि यात काळपटलेली काळी पितळ तांब्याची भांडी घाला आणि या मिश्रणात ती चांगली उकळू द्या. काही मेहनत न करता थोड्या वेळाच ही भांडी अगदी चकचकीत दिसणार. गणपती-गौरीच्या पूजेसाठी भांडी एकदम तयार झाली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Home Corner (@hhomeccorner)


hhomeccorner या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा ट्रीक सांगण्यात आली आहे. अनेक महिला पितळेच्या काळ्या पडलेल्या मूर्तीसाठी  टोमॅटो केचप तर कधी पीठ, मीठ आणि व्हिनेगर या 3 पदार्थांचं मिश्रण वापरली जातात.