Covid-19 Health: `या` घरगुती वस्तू वापरा आणि कोरोनावर करा मात!
कोरोना महासंकटाने अजून आपला पाठलाग सोडलेला नाही. म्हणून या व्हायरलपासून सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या घरातच काही रामबाण उपाय आहेत.
Covid-19 Health Alert: गेल्या दोन वर्षांपासून जगभराला कोरोना नावाच्या महासंकटाने घेरलं आहे. भारतात आता कुठे आयुष्य हळूहळू रुळावर आलं आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाच्या 3 लाटा येऊन गेल्या आहेत. देशात रविवारी 9,531 नव्या कोरोग्रस्तांची नोंद झाली आहे. तर सध्या देशात 97 हजार 648 रुग्ण आहेत. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर तुम्हाला कोरोना गाठू शकतो.
कोरोना काळात आयुर्वेदिक आणि घरगुती गोष्टींवर जास्त भर देण्यात आला होता. हळदीचं दूध, वेगवेगळे काढे याचं सेवन वाढलं होतं. लिंबू, संत्र्यांचं सेवन लोक करत होती. कोरोना हा एक प्रकराच फ्लूच आहे. जो पुढे जाऊन फुफ्फुसावर परिणाम करतो. या फ्लूमुळे शरीरात अजून काही समस्या झाल्यास आपल्या जीवाला धोका आहे.
कोरोना महासंकटाने अजून आपला पाठलाग सोडलेला नाही. म्हणून या व्हायरलपासून सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या घरातच रामबाण उपाय आहेत. त्यांचा उपयोग केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात घरातील हे तीन रामबाण उपाय (trending news red wine olive oil green tea may protect you from corona symptoms health tips)
रेड वाइन (Red Wine)
रेड वाइन हे एक प्रकारची दारु आहे. पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी हे सर्वोत्तम पेय आहे. संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, आठवड्यातून 3-4 किंवा त्याहून अधिक वेळा रेड वाइनचं सेवन केल्याने कोरोना संसर्ग टाळण्याचा धोका 20% कमी होतो. रेड वाइनमध्ये आढळणारा पॉलिफेनॉल नावाचा पदार्थ फ्लू दूर करण्यात मदत करतो, असं संशोधनात समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनापासून दूर राहण्यासाठी तुम्ही रेड वाइनचेही सेवन करू शकता.
ग्रीन टी (Green Tea)
ग्रीन टी याबद्दल माहिती नसणारे व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी उत्तम पेय आहे. त्याशिवाय ग्रीन टीमुळे आरोग्यास खूप फायदा होतो. नुकत्याच झालेल्या संशोधनात ग्रीन टीचं सेवन केल्यामुळे कोरोनाची लक्षणे नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट, अँटीव्हायरल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांमुळे ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम पेय आहे. त्यामुळे ग्रीन टीचं सेवन रोज करायला हवं.
पनीरचा शोध कसा लागला? 'ही' रंजक कहाणी तुम्हाला माहिती आहे का?
ऑलिव्ह ऑइल
वजन कमी करण्यासाठी साधा तेलाऐवजी अनेक लोक ऑलिव्ह ऑइलचा वापर करतात. ऑलिव्ह ऑइलपासून तयार केलेलं अन्न खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. याशिवाय मौसमी संसर्ग जसे की सर्दी, फ्लू, खोकला यापासून दूर राहण्यास ऑलिव्ह ऑइल उपयुक्त ठरतं. त्यामुळे कोरोनापासून दूर राहण्यासाठी तुम्ही रोजच्या जीवनात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करा.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)