मुंबई : मूळव्याध हा एक अत्यंत त्रासदायक विकार आहे. वेळीच या  समस्येकडे लक्ष न दिल्यास त्याचा त्रास अत्यंत गंभीर होतो. मग या त्रासातून मुक्ताता मिळवण्यासाठी शस्त्रक्रियेसारख्या उपचारांची मदत घ्यावी लागते. म्हणूनच सुरूवातीच्या टप्प्यात या समस्येवर उपाय म्हणून हा घरगुती उपाय करून पहा. 


जिरं - घरगुती उपाय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळव्याधीच्या समस्येपासून काही अंशी आराम मिळवण्यासाठी ‘जिरं’ अत्यंत उपयुक्त आहे. जिर्‍यात कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, सोडीयम, पोटॅशियम, व्हिटामिन सी व व्हिटामिन ए यांचे मुबलक प्रमाण असते. जिर्‍याचे सेवन केल्याने संपूर्ण शरीर  निरोगी राहण्यास मदत होते.


जिर्‍यामध्ये फायबर व वात कमी करण्याची क्षमता असल्याने पचन सुधारते तसेच शौचाला सुलभ होऊन मळ मऊ होण्यास मदत होते. तसेच पोटातील पचनक्रियेचा मार्ग सुधारून, संसर्ग कमी होण्यासही मदत  होते.


का आहे जिरे उपयुक्त ? 


जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात जिर्‍याची पूड मिसळून हे मिश्रण प्यावे. हे पाणी प्यायल्यानंतर 3-4 तासांत आराम मिळतो.आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !