Health Tips: सकाळी उठल्यावर `या` तीन सवयी वेळीच मोडा, नाहीतर पडू शकत महागात...
Bad Habits: आपल्यापैंकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील तर कधी त्या वाईट. परंतु चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्या आपली दिनचर्या (Lifestyle) ही चांगली ठेवता येते परंतु वाईट सवयींमुळे मात्र आपल्याला अनेकदा त्याचे दुष्पपरिणामच (Side Effects of Bad Habits) भोगावे लागतात.
Bad Habits: आपल्यापैंकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील तर कधी त्या वाईट. परंतु चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्या आपली दिनचर्या (Lifestyle) ही चांगली ठेवता येते परंतु वाईट सवयींमुळे मात्र आपल्याला अनेकदा त्याचे दुष्पपरिणामच (Side Effects of Bad Habits) भोगावे लागतात. आपल्याला लहानपणापासून कायमच आपले पालक तू चांगल्या सवयी लाव असं सांगत आले आहेत. कधी कधी आपल्याला वाईट सवयी मोडता येतात परंतु चांगल्या सवयी जाऊन वाईट सवय लागायला काही फार वेळ लागत नाही. त्यामुळे आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्याला चांगल्या सवयी लावणं बंधनकारक आहे. तेव्हा चांगल्या जीवनशैलीसाठी चांगल्या सवयी लागणं (Healthy Habits) हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु वाईट सवयी मात्र तुमच्या जीवनावरही बेतू शकतात. (try to avoid such bad habits in morning know more what are they)
तुम्हाला तुमच्या वाईट सवयी बदलणं ्महत्त्वाचं ठरणार आहे. चांगल्या जीवनशैलीचं महत्त्व हे सर्वांनाच असतं परंतु कधी कधी त्या सवयी लावल्या जातीलच असं नाही. चांगला आहार केल्यानं आणि नियमित जीवनशैलीचं पालन केल्यानं आपलं शारिरिक आणि मानसिक आरोग्यही (Mental Issues) सदृढ राहते. परंतु अनेकदा कामाच्या दगदगीमुळे आपल्याला चांगल्या प्रकार वेळेवर काम आटपून वेळेवर झोपणंही कठीण जातं. आपल्याला आपला फीटनेस राखण्यासाठीही खूप प्रोब्लेम होतो. अनेक जण चांगल्या सवयींमुळे आपला फीटनेसही खूप चांगला ठेवतात. परंतु आपल्यापैंकी प्रत्येकालाच काहीना काही वाईट सवयी या असतातच, तेव्हा तुमच्या आयुष्यातील या तीन सवयी घालवून टाकल्यात तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. त्या सवयी कोणत्या हे लगेचच जाणून घ्या.
बेडवर लोळताना हे अजिबात करू नका
अनेकांना आजकाल खूप वाईट सवय जडलीये ती म्हणजे बेडवर झोपलेलं असताना मोबाईल स्क्रीनकडेही (Moblie Screen) ते पाहत असतात. सकाळी लवकर उठल्या उठल्याही अनेकांनी बेडवर मोबाईल स्क्रिन पाहण्याची सवय असते. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा सतत फोनकडे पाहत राहता त्यानं तुमच्या दिसण्यावर परिणाम होऊ शकतो. तज्ञ सांगतात की सकाळी उठल्यावर आधी सुर्यप्रकाशाकडे पाहावे.
हेही वाचा - Alia - Raha नाही तर Wallpaper वर Ranbir kapoor नं ठेवलाय 'या' खास व्यक्तीचा फोटो
सकाळी लवकर उठा पण 'हे' करू नका
सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे परंतु काही लोक उठण्यासाठी जड आवाजाचा अलार्म वापरतात. आम्ही तुम्हाला सांगतो की आरोग्य तज्ञ अलार्मला (Alarm) चांगला मानत नाहीत कारण अचानक वाजलेल्या अलार्मचा आवाज सहानुभूतीशील मज्जासंस्था सक्रिय करतो. यामुळे शरीरात असे हार्मोन्स (Harmons) वाढू लागतात जे तणावासाठी जबाबदार असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की अलार्मचा जड आवाज हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही.
सकाळी असं उठा की...
सकाळी तुम्ही कशाप्रकारे अंथरूणातून उठता हे पाहणंही अत्यंत महत्त्वाचं असतं. जर का तुम्ही सरळ उठलात तर तुमच्या पाठीच्या कण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यातून पाठीच्या समस्याही वाढतात. तेव्हा सकाळी उठताना एका बाजूला वळणं खूप महत्त्वाचं आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)