मुंबई : थंडीत तापमानात झालेल्या बदलामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. अशावेळी त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण थंडीत त्वचा अधिक कोरडी होते. त्वचेला सुंदर, मुलायम ठेवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पण तुम्ही कधी हळदीचा फेसपॅक ट्राय केलाय? मग डॅमेज झालेली त्वचा सतेज करणयासाठी, पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी तुम्ही हळदीचा फेस मास्क नक्कीच वापरू शकता. तर बघुया कसा तयार करायचा हा मास्क?


हळदचं का ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हळदीत अॅक्टिव कंपाऊंड कर्क्यूमिन असते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, कर्क्यूमिन हे एक शक्तिशाली अंटीऑक्सिडेंट आहे. तसंच हळदीत अंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर त्वचेत असलेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.


ही काळजी घ्या


हळद सुरक्षित असते. मात्र ती योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. कारण त्याच्या अधिक प्रमाणामुळे जळजळ होऊ शकते. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी अतिरिक्त हळदीचे सेवन करू नये. त्यामुळे गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो. 


कशी वापराल?


हळदीत पाणी, मध घालून पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर लावा. काही वेळान पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पेस्टमध्ये तुम्ही दूधही घालू शकता.