दिल्ली : स्पुतनिक लसीसंदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. यानुसार स्पुतनिक लसीचे दोन डोस फायझर लसीच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या विरूद्ध दुप्पट अँटीबॉडीज देतात. या संशोधनात असं आढळून आलंय की, स्पुतनिक व्ही चे दोन डोस फायझर लसीच्या तुलनेत व्हायरसवर दुपट्टीने मात करण्यास मदत करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी तसंच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) यांनी गुरुवारी याबाबत ही माहिती दिली. इटालियन स्पॅलान्झानी इन्स्टिट्यूटमध्ये लसीकरण केलेल्या लोकांवर हा अभ्यास करण्यात आलाय. यामध्ये नागरिकांना स्पुतनिक व्ही आणि फायझरचे डोस देण्यात आले होते.


स्टडीचा दावा काय


गामालेया सेंटरचे संचालक अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांच्या म्हणण्याप्रमाणे "हार्ड सायंटीफिक डेटा हे सिद्ध करतो की, स्पुतनिक व्हीमध्ये ओमायक्रॉन विरुद्ध higher virus neutralizing activity आहे. त्यामुळे ही लस आणि संसर्गजन्य व्हायरसच्या विरुद्ध जागतिक पातळीवर मोठी भूमिका बजावेल."



अभ्यासाचे निष्कर्षांबाबत सांगताना गामालेया सेंटर आणि RDIF ने सांगितलं की "मिक्स अँड मॅचचा भाग म्हणून स्पुतनिक लाइटला चालना दिल्याने ओमायक्रॉन विरुद्ध mRNA लस लवकर शोधण्यात मदत होऊ शकते. एडेनोव्हायरल आणि एमआरएनए लस यांच्यातील भागीदारी ओमायक्रॉन आणि इतर व्हेरिएंटविरूद्ध चांगलं संरक्षण देऊ शकते."


"इटलीमधील अभ्यासाच्या निकालांनुसार, स्पुतनिक व्ही ओमायक्रॉन विरूद्ध सर्वात चांगलं संरक्षण प्रदान करते. एडिनोव्हायरल प्लॅटफॉर्मने यापूर्वी कोविड-19 मध्ये म्युटेशनविरूद्ध लक्षणीय परिणामकारकता दाखवली. स्पुतनिक व्ही लस गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि RDIF यांनी तयार केली आहे.