मुंबई : ताणतणाव हा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फार धोकादायक असतो. हा तणाव नैराश्य, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, लठ्ठपणा, हृदयविकार यासारख्या इतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे तणाव नियंत्रित करणं किंवा योग्य वेळी त्यावर उपचार करणं खूप महत्वाचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तणावावर उपचार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कोणता प्रकारचा तणाव आहे आणि त्यामागील कारण काय असू शकते हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ताण अनेक प्रकारचा असू शकतो, ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. तर जाणून घेऊया तणावचे प्रकार कोणते आहेत.


एंटीसिपेट्री स्ट्रेस (Anticipatory Stress)


जेव्हा आपण भविष्यातील पुढील गोष्टींविषयी जास्त विचार करता, तेव्हा आपणास एंटीसिपेट्री स्ट्रेस येऊ शकतो. या प्रकारच्या तणावात, आपणास बर्‍याचदा भविष्यात चूका होण्याची भीती व धोक्याची भावना असते. उदाहरणार्थ, आपण आगामी परीक्षेत नापास झाल्याची चिंता सतावण्यास सुरुवात होते.


एन्काउंटर स्ट्रेस (Encounter Stress)


जेव्हा आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीसमोर किंवा ग्रुपसमोर जाण्याची चिंता वाटू लागते. तसंच त्यांच्यासमोर जाणं टाळतो अशा वेळी तो एन्काउंटर स्ट्रेस असतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या बॉसच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला ताण जाणवत असेल तर तो एन्काउंटर स्ट्रेस असतो.


टाइम स्ट्रेस (Time Stress)


जेव्हा तुम्हाला वेळेबद्दल तणाव जाणवू लागतो तेव्हा समजून जा की, तुम्हाला टाईम स्ट्रेस आहे. या प्रकारच्या तणावात व्यक्तीला वेळेची कमतरता भासत राहते. त्याला असं वाटतं की, कोणतीही कामे वेळेवर पूर्ण करता येणार नाहीत. या प्रकारच्या ताणतणावामुळे बहुतेक वेळा ऑफिसमध्ये जाणाऱ्या व्यक्ती आणि अभ्यास करणारी मुलं तसंच डेडलाईनवर काम करणार्‍या लोकांना त्रास होतो.


सिच्युएशनल स्ट्रेस (Situational Stress)


जेव्हा तुम्ही एखाद्या परिस्थितीमुळे ताणतणाव असता तेव्हा सिच्युएशनल स्ट्रेस असतो. ही परिस्थिती जीवनात कधीतरी येऊ शकते. उदाहरणार्थ, मुलं नेहमीच परीक्षां जवळ असताना ताणतणाव असतात किंवा काहींना नोकरी गमावण्याच्या भीतीने तणावात असतात.