Corona Vaccine : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाविरुद्धच्या (Corona) लढ्यात आणखी एक यश आलं आहे. ब्रिटनने (Britain) अमेरिकी फार्मा कंपनी मॉर्डनाच्या अद्ययावत लसीला मंजूरी दिली आहे. ही लस यासाठी खास आहे कारण कोरोनावरच नाही तर कोरोनाचा प्रकार Omicron वरही प्रभावी ठरणारी आहे. मॉर्डनाच्या या अद्ययावत लसीच्या (Moderna Vaccine) वापराला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोना लसीत वेळोवेळी आवश्यक बदल करण्याची गरज असल्याचं याआधीच तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. कारण कालांतराने रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमकुवत होऊ लागते आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. 


हा धोका लक्षात घेऊन मॉर्डनाहे ही लस तयार केली आहे. ही लस ओमिक्रॉन सब व्हेरियंट  BA.1 बरोबरच कोरोनाच्या मूळ स्ट्रेनवरही प्रभावी ठरु शकते असा दावा कंपनीने केला आहे. 2020 मध्ये जगभरात कोरोनाचा फैलाव सुरु झाला. यानंतर कोरोनाचे अनेक व्हेरियंट्स समोर आले. या बदलत्या व्हेरियंट्सवर अद्ययावत लस जरुरी आहे.


कशी आहे मॉर्डना लस?


- ब्रिटनच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA) मॉर्डना लसीच्या वापराला मान्यता दिली आहे. अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही लस बूस्टर डोस म्हणून दिली जाईल.


- या लसीला बायवालेंट (Bivalent) असं नाव देण्यात आलं आहे. बायवालेंट म्हणजे अशी लस जी भिन्न विषाणूंवर प्रभावी आहे.


- या लसीचा बूस्टर डोस 50 मायक्रोग्राम असेल. यातील 25 मायक्रोग्राम विषाणूच्या मूळ स्ट्रेनला लक्ष्य करते तर 25 मायक्रोग्राम  Omicron ला लक्ष्य करते.



- क्लिनिकल चाचण्यांमध्ये ही लस ओमिक्रॉनच्या BA.1 तसंच कोरोनाच्या मूळ स्ट्रेनवर प्रभावी ठरली आहे.


इतर लसींपेक्षा का आहे वेगळी?


- कोरोनावर आतापर्यंत अनेक लसी उपलब्ध झाल्या आहेत. या लसी कोरोनाच्या मूळ स्ट्रेनला लक्ष्य करतात


- पण गेल्या वर्षभरात कोरोनाचे अनेक व्हेरियंटस समोर आला आहेत. यापैकी Omicron सर्वाधिक संसर्गजन्य आहे.


- गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा Omicron व्हेरियंट आढळून आला होता. यानंतर भारतासह जगातील अनेक देशांमध्ये Omicron चा फैलाव झाला.


- हे लक्षात घेऊनच मॉर्डनाने अद्ययावत लसीची निर्मिती केली आहे. ही लस ओमिक्रॉन सब व्हेरियंट  BA.1 बरोबरच कोरोनाच्या मूळ स्ट्रेनवरही प्रभावी ठरु शकते असा दावा कंपनीने केला आहे.


किती सुरक्षित आहे लस?


- गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मॉर्डनाने लस अद्ययावत केल्याची माहिती दिली होती. यावर्षी जून महिन्यात या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्यात आली. तब्बल 800 लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली.


- चाचणी दरम्यान या लसीचा 50 मायक्रोग्रामचा बूस्टर डोस लोकांना देण्यात आला. विशेष म्हणजे या लोकांमध्ये Omicron विरुद्ध लढण्याची 8 पट जास्त प्रतिकारशक्ती दिसून आली. 


- कंपनीने या लसीच्या वापरासाठी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) परवानगीही मागितली आहे. मात्र अद्यापपर्यंत FDA त्यास मान्यता दिलेली नाही.


भारतात येणार मॉर्डनाची अद्ययावत लस


- केंद्र सरकारने गेल्या वर्षी जूनमध्ये मॉडर्नाच्या लसीच्या वापरास भारतात वापरण्यासाठी मान्यता दिली. सरकारने भारतीय फार्मा कंपनी सिप्लाला ही लस आयात करण्याचा परवाना दिला होता.


- पण आजपर्यंत मॉडर्ना भारतीय बाजारात आलेली नाही. भारतात बूस्टर डोस सुरू झाला आहे. मात्र ही लस भारतात येईल की नाही याबाबत काहीही सांगता येणार नाही.


UK approve Moderna vaccine targeting Omicron variant