Benefits of honey massage: मध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आयुर्वेदात मधाच्या विविध फायद्यांबाबत लिहिलं आहे. अनेक घरगुती उपायांमध्ये मधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मधात अँटीइंफ्लामेटरी गुणधर्म असतात. मधामुळे घशातील खवखव दूर होण्यास मदत होते. मध हे खोकला आणि चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी फायदेशीर आहे. त्वचेवरील मधाच्या वापराने त्वचा नितळ होण्यास मदत होते. जाणून घेऊयात तळव्यांवर मधाचा वापर केल्यास कोणते फायदे होतात, त्याबद्दल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायांच्या तळव्यांवर मध लावण्याचे फायदे 


स्किनसाठी आहे फायदेशीर


जर तुमच्या पायाची स्किन सुकली असेल तर त्यावर तुम्ही मध लावू शकतात. पायाच्या तळव्यांवर मधाची मालिश केल्यास पाय आणि तळवे हायड्रेटेड राहतात. मधाच्या वापराने तुमच्या स्किनवरील डाग देखील कमी होण्यास मदत होते आणि चेहऱ्याची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही दररोज पायाच्या तळव्यांवर मधाची मालिश करू शकतात. 


ब्लड सर्क्युलेशन सुधारतं  


पायाच्या तळव्यांची मधाने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारतं. याने याने तुमच्या हात पायांच्या दुखण्यावरही आराम मिळतो 


सूज ठीक होते 


जर तुमच्या पायावर सूज आली असेल तर मध त्यावर चांगला उपाय आहे. पायावरील सुजेवर मध लावल्याने सूज कमी होण्यास मदत होते. मधात अँटीइंफ्लामेटरी गुण असतात. याने पायावरील सूज कमी होण्यास मदत होते.


टाचेवरील भेगा भरून निघतात


तळव्यांना मध लावल्याचे विविध फायदे आहेत. तळव्यांवर मध लावल्याने टाचेवरील भेगा भरून निघण्यास मदत होते. मधामुळे तळव्यांमध्ये मऊपणा टिकून राहतो. 


(विशेष नोंद - वरील बातमीतील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा दैनंदिन आयुष्यात वापर करायचा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. )


unbelievable benefits of honey massage on body and feet