Unhealthy Foods For Kids : लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लहान वयातच योग्य आहार देणं ( Good Food for kids) गरजेचं आहे. मात्र सध्याच्या धावपळीच्या जगात पालकांना मुलांकडे ( Kids Health ) तेवढं लक्ष देता येत नाही. अशात पालकच मुलांना पटकन काहीतरी खायला देतात ( Junk Food) , जे पदार्थ मुलांसाठी हानिकारक ठरू शकतं. सध्याच्या धावपळीच्या जगात नवरा बायको दोघे नोकरी करतात. त्यांना मुलांकडे हवं तेवढं लक्ष देता येत नाही. मुलांनी कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला की अशात त्याचं मन वळवण्यासाठी पटकन चिप्स देणं, आईस्क्रीम देणं, बिस्कीट, चॉकलेट्स सर्रास दिले जातात. मात्र या गोष्टींचा मुलांच्या मानसिक विकासावर ( Mental development) आणि शारीरिक विकासावर परिणाम होत असतो हे पालक विसरतात. म्हणूनच मुलांना लहान वयात कोणते पदार्थ हानिकारक (Bad food for development of child)  ठरू शकतात याबाबत माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. या बातमीच्या माध्यमातून लहान मुलांना कोणत्या गोष्टी खायला देऊ नये, याबाबत जाणून घेणार आहोत. 


बिस्कीट केक आणि चॉकलेट्स - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांना या गोष्टी  खायला द्यायच्या आधी पालक जास्त विचार करत नाहीत. पण लहान मुलांच्या आरोग्यसाठी या गोष्टी हानिकारक असतात. बिस्कीट, चॉकलेट्स, केक यांचा सेवनाने लहान मुलांमध्ये जाड्यत्व, मधुमेह आणि हृदयासंबंधित आजाराचा धोका वाढतो. 


चिप्स आणि पॅक वेफर्स - 


चिप्स किंवा पॅक वेफर्समध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं  लहान वयातच मिठाच्या जास्त सेवनाने मुलांच्या किडनीवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच पॅक्ड फूड, वेफर्स, चिप्स अशा गोष्टी मुलांना खायला देऊ नका. 


कच्चं दूध आणि पनीर - 


कच्चं दूध आणि पनीर मुलांना खायला देऊ नका. यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया असतात. हानिकारक बॅक्टेरियामुळे लहान मुलांना अतिसार आणि धोकादायक संक्रमण होऊ शकतं. यामुळे हाना मुलांच्या आतड्याला देखील त्रास होऊ शकतो. 


साखरेचे पदार्थ - 


बाजारात विविध प्रकारची पेय मिळतात ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. याच्या सेवनाने मुलांमध्ये जाड्यत्व आणि हृदयासंबंधित संशय वाढण्याची भीती आहे. साखरेचं प्राण जास्त असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने मुलांचे दात किडतात. जर तुमच्या मुलांना गोड खावंसं वाटलं तर त्यांना फळं किंवा सुकामेवा खायला द्या. यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. 


व्हाईट ब्रेड- 


बाजारात मिळणार व्हाईट ब्रेड मैद्यापासून तयार होतो. तयार झालेला ब्रेड जास्त दिवस टिकावा म्हणून त्यामध्ये विविध प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह टाकले जातात. सोबतच व्हाईट ब्रेडमध्ये मीठ आणि सोडियमचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात व्हाईट ब्रेड खाण्याने खाज, ऍलर्जी, स्किनवर रॅशेस अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ब्रेडव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलांना घरी तयार करण्यात आलेले ओट्स पॅनकेक किंवा लापशी खायला द्या.    


फळं आणि दही एकत्र खाणं  -


फळं किंवा दही खाणं शरीरासाठी अत्यंत आयोग्यदायी असतं. मात्र मुलांना चुकूनही या दोन्ही गोष्टी एकत्र देऊ नका. दही आणि फळं एकत्रित खाण्याने शरीरात विविध प्रकारचे टॉक्सिन्स तयार होतात. याने मुलांच्या आतड्याला नुकसान होऊ शकतं. म्हणूनच मुलांना दही दिल्यानंतर काही वेळाने फळं खायला द्या. या दोन्ही गोष्टी एकत्र खायला देऊ नका. 


(डिस्क्लेमर - वरील दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन जीवनात याचा वापर करायचा झाल्यास डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)