मुंबई : 'एकादशी आणि दुप्पट खाशी' असे अनेकदा म्हटले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही उपवास करत असाल तर खूप खाणं अपेक्षित नाही. पण सोबतच काहीही न खाणंदेखिल त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच योग्य वेळी आणि प्रमाणात खाण्याची सवय ठेवा. 


 तुम्ही उपवासाला साबुदाण्याची खिचडी, राजगिर्‍याच्या पुर्‍या, थालिपीठ नक्की करून पाहिले असेल पण पचायला हलका आणि झटपट होणारा राजगिर्‍याचा उपमा तुम्ही कधी करून पाहिला आहे का ? चला मग आज  करून पाहुया हा उपमा –
साहित्य – 
राजगिर्‍याचा रवा
मीठ
जिरं
बदामाची पूड
शेंगदाणे
खोबरे- मिरचीची पेस्ट
कृती – 
राजगिरा भाजून त्याची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
कढईत तेल/तूप गरम करून त्यामध्ये जिरं, शेंगदाणे,खोबरं-मिरचीची पेस्ट टाकून गरम पाणी ओतावे.
उकळी आल्यानंतर त्यात राजगिर्‍याचा रवा मिसळावा व चवीनुसार मीठ घालून परतावे.
थोड्यावेळ झाकून वाफ येऊ द्यावी. म्हणजे तो व्यवस्थित शिजेल.