शरीरात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन (Infection) झालं तर ते तुम्हाला महागात पडू शकते. मग ते युरिन इन्फेक्शन (Urinary Infection) असो अथवा इतर कोणतेही. युरिन इन्फेक्शन हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होतो, परंतु स्त्रियांमध्ये याची शक्यता जास्त असते. लघवीच्या संसर्गामुळे कधीकधी गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे युरिन इन्फेक्शनची लक्षणे कोणती आहेत? व इन्फेक्शन टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहीजे? हे जाणून घेऊयात. 


महिलांना इन्फेक्शन जास्त का होतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या तुलनेत पुरुषांना संसर्गाचा धोका कमी असतो. यामागील कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग लहान आणि गुदाशयाच्या जवळ असतो. यामुळे, शरीरात प्रवेश करणारे जीवाणू सहजपणे मूत्रमार्गात प्रवेश करतात. पुरुषांमध्ये अंतर्गत मूत्रसंसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो.


लक्षणे काय?


अंतर्गत भागात खाज वाढत असल्यास, लघवी करताना वेदना किंवा जळजळ होते. सर्व वेळ लघवी गेल्याची भावना, लघवीत रक्त येणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे ही लक्षणे आहेत. युरिन इन्फेक्शन (Urinary Infection) दीर्घकाळ राहिल्यास ते हळूहळू आतमध्ये वाढते आणि किडनी इन्फेक्शनचाही धोका उद्भवतो. 


डॉक्टरांचा सल्ला काय? 


डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर एखाद्या महिलेला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) (Urinary Tract Infection) झाला असेल तर ती या आजाराला सहज बळी पडू शकते. लैंगिक संपर्कात येताना सावधगिरी बाळगली पाहिजे. गरोदरपणात, वय कमी-जास्त झाल्यावर आणि स्वच्छतेच्या अभावामुळे हा संसर्ग होतो. तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही रोज आंघोळ करत नसाल तर आंघोळीची सवय लावा. लैंगिक संपर्कात आल्यावर लघवीला जा. अंतर्गत भागात अशी कोणतीही पावडर, साबण किंवा स्प्रे अजिबात वापरू नका. सार्वजनिक शौचालयात जाणे टाळा. कोणतीही समस्या असल्यास, त्वरित डॉक्टरांना भेटा. त्यानुसार औषधे घ्यावीत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)