केस लांब आणि घनदाट करण्यासाठी `या` तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल
Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.
Hair Fall Home Remedy : केस गळतीची समस्या असेल तर आता चिंता करत बसू नका. तुम्ही घरच्या घरी उपाय करु शकतात. आम्ही तुम्हाला कढीपत्त्याची एक पद्धत सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी मिक्स कराव्या लागतील आणि त्या केसांना लावल्यानंतर केसांची लांबी वाढेल, तसेच केस गळणे आणि तुटणे देखील कमी होईल. चला तर मग केस गळती रोखण्यासाठी काय उपाय आहे, ते जाणून घ्या.
आपण केसांची निघा योग्य प्रकारे राखली नाही तर केसांची समस्या डोके वर काढते. केस गळतीमुळे टक्कलही पडते. तसेच आजकाल, लोकांमध्ये लांब केस ठेवण्याचा छंदही दिसून येत आहे. तर दुसरीकडे ज्या लोकांना केसांची वाढ मंदावली आहे, ते केस वाढवण्याचा पर्याय निवडत आहेत. असे असले तरी त्यांना त्यासाठी महागडा खर्च उचलावा लागतो. मात्र, आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगत आहोत ज्याचा वापर करुन तुम्ही एका महिन्यात केसांची वाढ चागली करु शकता आणि यासाठी तुम्हाला केवळ एक रुपया खर्च करावा लागेल. आम्ही तुम्हाला कढीपत्त्याचा महत्त्वाचा एक उपाय सांगत आहोत, ज्यात तुम्हाला दोन गोष्टी मिक्स करायच्या आहेत. ते तेल केसांना लावल्याने केसांची लांबी वाढेल, तसेच केस गळणे आणि तुटणे देखील कमी होईल. जाणून घ्या, घरी हे तेल कसे तयार करायचे ते.
घरी कसे बनवायचे कढीपत्त्याचे तेल?
घरी कढीपत्त्याचे हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला चार चमचे खोबरेल तेल, मूठभर कढीपत्ता आणि 20 ग्रॅम मेथीची गरज आहे. हे बनवण्यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त हे तिन घटक खोबरेल तेलात मिसळून उकळायचे आहे. मेथीचे दाणे आणि कढीपत्ता मऊ आणि लवचिक होईपर्यंत ते उकळत राहा.
आता तुम्ही गॅस बंद करुन मेथी दाणे आणि कढीपत्ता नीट मिक्स करुन घ्या. नंतर ते थंड होण्यासाठी ठेवा आणि काचेच्या बाटलीत गाळून भरु ठेवा. आता तुम्ही आठवड्यातून दोन दिवस या तेलाची मालिश करुन केसांचे आरोग्य सुधारु शकता.
यामुळे तुमच्या केसांची लांबी वाढेल तसेच केस गळणे आणि तुटणे कमी होईल. हे तेल केसांना तुटण्यापासून वाचवते. त्यामुळे आजपासूनच या तेलाने डोक्याचा मसाज सुरु करा आणि बघा तुमचे केस कसे काळे, घट्ट आणि लांब होतील ते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)