मुंबई : कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी हँड सॅनिटायझरच्या वापराचा सल्ला देण्यात येतो. गेल्या वर्षभरापासून प्रत्येकाने सॅनिटाझरचा भरपूर वापर केला आहे. मात्र आता डॉक्टरांनी सॅनिटाझरच्या वापराबाबत इशारा दिला आहे. हॅंड सॅनिटाझरचा अतिवापर त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतो. या शिवाय एका अभ्यासातून यामुळे अंधत्व येऊन मृत्यू होण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅंड सॅनिटाझरमध्ये असलेल्या केमिकल्समुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. दरम्यान काही सॅनिटाझरमध्ये केमिक्सल तसंच मेथनॉल यांचा वापर केला जातो. जर हे घटक तुमच्या हाताद्वारे शरीराच्या आत गेले तर अंधत्व येऊन मृत्यू होण्याचा दावा करण्यात आला आहे. 


सॅनिटाझरच्या वापरामुळे होणाऱ्या साईड इफेक्ट्स संदर्भात लहान मुलांमध्ये अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मेथनॉल त्वचेद्वारे शरीराच्या आत पोहोचू शकतो. त्यामुळे काही देशांमध्ये हॅंड सॅनिटाझरचा वापरावर प्रतिबंध घालण्यात आलं आहे.  


बोस्टन ग्लोबलच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी हँड सॅनिटायझर्सच्या विक्रीत 620 टक्के वाढ झाली आहे. याचदरम्यान डेली मेलच्या एका अहवालानुसार, गेल्या वर्षी अ‍ॅरिझोना आणि न्यू मेक्सिकोमध्ये हँड सॅनिटाझरच्या वापरामुळे दुष्परिणाम झाल्याची नोंद सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनमध्ये झाली आहे. असा दावा केला जातोय की, चार रुग्णांचा मृत्यू झाला आणि तीन जणांची दृष्टी गेली.


त्यामुळे जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच हँड सॅनिटायझर वापरण्याची शिफारस डॉक्टरांकडून करण्यात येतेय. घरी सॅनिटायझर वापरणं टाळा. साबण आणि पाणी उपलब्ध असेल तर हँड सॅनिटायझर वापरू नका.