व्हायग्रा घेणाऱ्या पुरुषांनी सावधान! याचा तुमच्या आरोग्यावर असाही परिणाम होऊ शकतो
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.
मुंबई : व्हायग्रा घेतल्याने पुरुषांच्या लिंगामध्ये रक्तप्रवाह तात्पुरता वाढतो. ज्यामुळे बऱ्याचदा लैंगिक क्षमता तात्पुरती सक्रिय करण्यासाठी अनेक पुरुष याचा वापर करतात. ही गोळी हलक्या निळ्या रंगाची असते, तसेच त्याचा आकार हिऱ्यासारखा असतो. त्याचे ब्रँड नाव sidenafil citrate आहे. परंतु तुम्हाला माहितीय का असे करणे धोक्याचे ठरु शकते? जे नियमित व्हायग्रा घेतात त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम हळूहळू दिसू लागतो.
नियमित व्हायग्रा घेतात असलेल्या पुरुषांच्या दृष्टीवर याचा परिणाम होतो. ज्यामुळे 80 टक्क्यांपर्यंत त्यांची दृष्टी नष्ट होऊ शकते.
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधकांचा दावा आहे की, व्हायग्रा, सियालिस, लेविट्रा आणि स्पॅड्रामध्ये वापरल्या जाणार्या औषधांमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. जाणून घ्या व्हायग्रामुळे डोळ्यांच्या समस्यांवर कसा परिणाम होतो.
संशोधक म्हणतात, उत्साह आणण्यासाठी व्हायग्राचा वापर केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती व्हायग्रा घेते तेव्हा रक्त परिसंचरण वेगाने वाढते आणि त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. त्याच्या प्रभावामुळे, अचानक दिसणं बंद होऊ शकते, तर डोळ्यांवर गडद डाग देखील येऊ शकतात. त्यामुळे व्हायग्राच्या नियमित वापराबाबत सतर्क राहण्याची गरज आहे.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, व्हायग्राचे धोके समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी सुमारे 2 लाख लोकांवर चार वर्षे संशोधन केले. संशोधनात असे दिसून आले आहे की, जे नियमितपणे याचा वापर करतात त्यांनाच डोळ्यांशी संबंधित समस्या दिसून आल्या. यामध्ये रेटिनाशी संबंधित समस्यांचा समावेश आहे.
संशोधनात सहभागी असलेल्या पुरुषांना इस्केमिक ऑप्टिक न्यूरोपॅथीचा धोका 102% वाढला होता. अशा स्थितीत डोळ्यांच्या नसांमध्ये रक्तपुरवठा होत नाही, त्याच वेळी, 44 टक्के पुरुषांना रेटिनामध्ये रक्त गोठण्याची समस्या दिसू लागली. ज्यामुळे त्यांच्या डोळे लाल झालेले किंवा डाग आल्यासारखे दिसतात.
संशोधकांनी त्यांच्या संशोधनातून व्हायग्रा घेणार्यांना सतर्क केले आहे. तथापि, Viagra बनवणारी कंपनी Pfizer ने असेही म्हटले आहे की ते घेत असलेल्या 100 पैकी एका व्यक्तीला जळजळ, लालसरपणा, वेदना आणि पाणी येण्याची तक्रार उद्भवत आहे.